Maharashtra LokSabha Election 2024 | बावनकुळे,मुंडे यांच्यासह १० नवीन चेहऱ्यांना भाजप उतरवणार लोकसभेच्या मैदानात ?

Maharashtra LokSabha Election 2024 |  लोकसभेच्या आगामी निवडणुकांसाठी जागावाटपाबाबत राजकीय पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात बैठका सुरू आहेत. कोणता उमेदवार निवडला जाईल आणि कोणाचे तिकीट कापले जाईल याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.राज्यातील विद्यमान खासदारांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी भाजपने तीन सर्वेक्षण केले आहेत. डझनभर खासदारांचा स्ट्राइक रेट समाधानकारक नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ज्या खासदारांचा स्ट्राइक रेट चांगला नाही अशा खासदारांना हटवले जाण्याची शक्यता आहे.

यातच आता केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी तिसऱ्यांदा नागपुरातून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आणि ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यादेखील लोकसभेच्या (Maharashtra LokSabha Election 2024) रिंगणात उतरू शकतात. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना वर्धा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. तसेच भाजपा लोकसभेच्या रिंगणात सुमारे १० नवीन चेहऱ्यांना संधी देईल असं सांगितले जात आहे.

पुढील २ दिवसांत भाजपा १५० उमेदवारांच्या नावाची दुसरी यादी जाहीर करेल. निवडणूक तारखेच्या घोषणेआधीच भाजपा ३४५ उमेदवार घोषित करू शकते. ज्यामुळे निवडणूक प्रचाराला जास्तीत जास्त वेळ मिळण्याची शक्यता आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Sunil Shelke | …अन्यथा मी राज्यभर सांगणार की पवार साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप केले, सुनिल शेळकेंचा इशारा

Amit Shah | अमित शाह हे शेपूट घालणारे गृहमंत्री; उद्धव ठाकरे यांची सडकून टीका

Sharad Pawar | पक्ष स्थापनेपासून आम्ही विचारधारा कधीच बदलली नाही; शरद पवार यांचा दावा