Sarfaraz Khan | सरफराज खानमुळे 3 दिग्गज खेळाडूंच्या कसोटी कारकिर्दीवर टांगती तलवार,संघात पुनरागमन अशक्य!

Sarfaraz Khan | भारतीय संघाचा युवा फलंदाज सर्फराज खानने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या सामन्यात कसोटी कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. राजकोट कसोटीत सर्फराजने भारताकडून पदार्पण केले. ज्यामध्ये त्याने दोन्ही डावात शानदार अर्धशतके झळकावली. आता धर्मशाला कसोटीच्या (Dharamsala Test) पहिल्या डावात त्याने पुन्हा एकदा इंग्लंडविरुद्ध अर्धशतक झळकावले आहे. सरफराज खानच्या (Sarfaraz Khan ) या अर्धशतकाने एक-दोन नव्हे तर तीन महान भारतीय खेळाडूंची कारकीर्द संपुष्टात आली आहे. सर्फराज खान इंग्लंडविरुद्ध चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करत आहे.

पुजाराचे पुनरागमन अवघड
धरमशाला कसोटीत सरफराज खानच्या अप्रतिम अर्धशतकानंतर भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराचे पुनरागमन अवघड वाटत आहे. 36 वर्षीय पुजाराने यंदाच्या रणजी ट्रॉफीमध्ये खूप धावा केल्या आहेत, तरीही त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. उलट त्याच्या जागी युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

विराट कोहलीच्या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर पुजारा संघात पुनरागमन करेल अशी आशा होती, मात्र त्याच्या जागी रजत पाटीदारला संधी देण्यात आली. तर केएल राहुल विशाखापट्टणम कसोटीतून बाहेर झाल्यानंतर सरफराज खानचा संघात समावेश करण्यात आला. केएलच्या बाहेर पडल्यानंतर पुजाराच्या नावाची चर्चा तीव्र झाली, पण सिलेक्टसने या चर्चांना पूर्णविराम दिला आणि सर्फराज खानचा संघात समावेश केला.

अजिंक्य रहाणेला संधी मिळणे कठीण
आता त्याच मैदानावर सर्फराज खानने भारतासाठी 3 कसोटी सामन्यांमध्ये तीन अर्धशतके झळकावली आहेत. अजिंक्य रहाणे भारतीय संघात पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत असे. तर सर्फराज खानकडे इंग्लंडविरुद्ध पाचव्या क्रमांकाची जबाबदारी देण्यात आली आहे. रहाणेने 2023 मध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. ज्यामध्ये तो धावा करण्यात अपयशी ठरत होता.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

सरफराजने हनुमा विहारीसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद केले
सर्फराज खानच्या फॉर्ममुळे हनुमा विहारीचे टीम इंडियात पुनरागमन करणे कठीण झाले आहे. हनुमा विहारीने भारतासाठी 16 कसोटी सामने खेळले, पण कसोटीत तो प्रभाव पाडू शकला नाही. विहारी 2022 मध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला. त्यानंतर तो टीम इंडियात पुनरागमन करू शकला नाही. तर सरफराज खानच्या कामगिरीनंतर त्याचे पुनरागमनही खूप कठीण दिसत आहे. रणजी ट्रॉफी 2024 मध्ये हनुमा विहारीची संमिश्र कामगिरी होती, परंतु त्याची कामगिरी टीम इंडियाचे दरवाजे उघडण्यासाठी पुरेशी नव्हती.

महत्वाच्या बातम्या :

Sunil Shelke | …अन्यथा मी राज्यभर सांगणार की पवार साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप केले, सुनिल शेळकेंचा इशारा

Amit Shah | अमित शाह हे शेपूट घालणारे गृहमंत्री; उद्धव ठाकरे यांची सडकून टीका

Sharad Pawar | पक्ष स्थापनेपासून आम्ही विचारधारा कधीच बदलली नाही; शरद पवार यांचा दावा