पावनखिंड आणि आगामी सरसेनापती हंबीरराव मोहिते हा सिनेमाही टॅक्स फ्री करा – बाबासाहेब पाटील

मुंबई – बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करत असल्याचे दिसत आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या सिनेमावरून काही वाद देखील निर्माण होताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात ‘द काश्मीर फाईल्स‘ (The Kashmir Files) सिनेमा चर्चेचा विषय ठरलाय. भाजप या चित्रपटाच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. हा काश्मीरी पंडियतांवर झालेल्या अन्यायाचा ज्वलंत इतिहास आहे, असं म्हणत या सिनेमाला टॅक्स फ्री (करमुक्त) करा, अशी मागणी भाजपकडून वारंवार करण्यात येतेय.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने (NCP) छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) आधारित सिनेमे टॅक्स फ्री करा, अशी मागणी आम्ही केली आहे. “महाराष्ट्राचा जाज्ज्वल्य इतिहास दाखविणाऱ्या चित्रपटांना महाराष्ट्रात करमुक्त करावं. सध्या चित्रपटगृहात सुरु असलेल्या पावनखिंड चित्रपटालाही करमुक्त करावं. तसंच आगामी ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते’ हा सिनेमाही टॅक्स फ्री करा”, अशी मागणी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्ष म्हणून बाबासाहेब पाटील यांनी केली आहे.