पारंपारिक शेतीच्या पलीकडे जाऊन ‘पेरू’ची लागवड करा अन् लाखोंचं उत्पन्न घ्या !

अहमदनगर : पारंपारिक शेतीच्या पलीकडे जाऊन शेतकरी जेव्हा शेतीचा विचार करू लागतो तेव्हा तो शेतीत क्रांती घडवू शकतो आणि लाखोंची कमाई साहच करतो. असाच एक पर्याय म्हणजे ‘पेरू’चा बाग. आज आपण पेरू पिकातून भरघोस उत्पन्न कसे घेऊ शकतो हे पाहूयात.

आपल्या भागातील पाऊसमानानुसार पेरूची लागवडीची वेळ ठरवावी. कमी पावसाच्या प्रदेशात पावसाळ्याच्या सुरवातीस शक्य तितक्या लवकर लागवड करावी, तर जास्त पावसाच्या प्रदेशात पावसाळा संपल्यावर लागवड करावी.

जमीन

पाण्याचा निचरा होणारी, मध्यम ते हलक्या प्रतीची जमीन

जाती

सरदार (एल -४९)

अभिवृध्दीचा प्रकार

दाब कलम

लागवडीचे अंतर

६० X ६० X ६० सें.मी आकाराचे खड्डे घेऊन २ कि. सिंगलसुपर फॉस्फेट खत टाकावे. ५ % मॅलॅथिआन (५०-६० ग्रॅम) पावडर मिसळावी. दोन झाडातील व ओळीतील अंतर ६ X ६ मीटर प्रति हेक्टरी झाडांची संख्या २७७ घन लागवडासाठी ३ X २ मी. अंतर ठेवावे.

खते

पूर्ण वाढ झालेल्या झाडास ४ ते ५ घमेली शेणखत, ९०० ग्रॅम नत्र, ३०० ग्रॅम स्फुरद व ३०० ग्रॅम पालाश, झाडाला बहार धरण्याचे वेळी द्यावीत पैकी निम्मा नत्र बहाराच्या वेळी व उरलेला नत्र फळधारणेनंतर द्यावा तर स्फुरद व पालाश एकाच हप्त्यात बहाराच्या वेळी द्यावा.

उत्पादन

७०० ते १५०० फळे प्रत्येक कलमी झाडापासून मिळतात.

कीड व रोग नियंत्रण

  • पिठ्या ढेकूण – पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी जैविक व्हरटीसिलीयम लेकाणी (फुले बर्गासाईड) – ४० ग्रॅम १०० मि.ली. दुधात मिसळून १० लिटर पाण्यात फवारावे.
  • फळमाशी – फळमाशीचे नियंत्रणासाठी रक्षक सापळ्याचा वापर करावा.
  • मर रोग – मर रोग नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा पावडर (१०० ग्रॅम/झाड) शेणखतात मिसळून मातीत टाकावे किंवा बोर्डो मिश्रण (१%) द्रावणाची मातीत जिरवणी करावी.

फळावरील डागांसाठी बाविस्टीन (०.१ %) + मॅन्कोझेब (०.२ %) ची फवारणी करावी.

इतर महत्त्वाचे

बागेत फांद्यांची दाटी झाल्यानंतर भरपूर सुर्यप्रकाश व हवा खेळती राहण्यासाठी तसेच यंत्राने मशागत करण्यासाठी हलकी छाटणी केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. उन्हाळ्यात फळांचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी २-४-५ टी ७० पीपीएम या संजीवकाची फवारणी करावी.

हे देखील पहा