Virat Kohli | हार्दिक पांड्यासाठी जे रोहितनेही केलं नाही, ते विराटने करून दाखवलं; खिलाडूवृत्तीचं होतंय कौतुक

Virat Kohli Requests Fans For Hardik Pandya | गुरुवारी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार हार्दिक पंड्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध फलंदाजी करण्यासाठी क्रीझवर आला तेव्हा वानखेडे स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांनी त्याला पुन्हा ट्रोल करायला सुरू केले. आयपीएल 2024 च्या 25 व्या सामन्यात प्रेक्षकांच्या वागणुकीमुळे विराट कोहली खूपच निराश दिसला.

कोहलीने (Virat Kohli) वानखेडेवरील प्रेक्षकांकडे बोट दाखवत हार्दिक पांड्याचे कौतुक करण्याचे आवाहन केले. विराट कोहली प्रेक्षकांकडे बोट दाखवत असल्याचा व्हिडिओ काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. हार्दिक पांड्याने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात शानदार कामगिरी केली, त्याने मुंबई इंडियन्ससाठी सामना जिंकणारी खेळी खेळली. त्याने अवघ्या 6 चेंडूत तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 21 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट 350 होता.

आरसीबीने दिलेल्या 197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने डावाच्या 12व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रोहित शर्माची विकेट गमावली. जॅक्सने रोहितला टोपलेकरवी झेलबाद केले. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या क्रीजवर आला. वानखेडेवरील प्रेक्षकांनी कर्णधार हार्दिक पंड्याला ट्रोल करायला सुरू केले.

आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीला प्रेक्षकांची ही वृत्ती आवडली नाही. त्याने हार्दिक पांड्याचे कौतुक करण्यासाठी प्रेक्षकांकडे हातवारे केले. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी भरपूर षटकार ठोकल्याने विराट कोहलीला क्षेत्ररक्षणावर जास्त मेहनत करण्याची गरज नव्हती आणि मुंबईने अवघ्या 15.3 षटकांत तीन गडी गमावून आवश्यक लक्ष्य गाठले. मात्र विराट कोहलीचे कौतुक केले जात आहे, ज्याने खिलाडूवृत्ती दाखवत विरोधी कर्णधाराला बुचकळ्यात टाकण्यापासून वाचवले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

“पुण्यात भाऊ, तात्या कोणी नाही, तर मुरलीधर मोहोळच निवडून येणार”, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

Ajit Pawar | “तुम्ही मला मूर्ख समजू नका, मी…”, अजित पवार ‘त्या’ प्रश्नावर भडकले

Vasant More | रवींद्र धंगेकर आमदार होऊनही कसब्यात विकासकामे झाली नाहीत