Narayan Rane | मनोज जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, मी त्याला मराठ्यांचा नेता मानत नाही

Narayan Rane : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. सगे सोयरे शब्दाच्या अमंलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची प्रकृती खालावली असून, त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत आहे. मात्र तरी देखील त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. सगे सोयरेची मागणी मान्य झाली, मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे.

मनोज जरांगेंची प्रकृती खालावत असल्यामुळे उपोषण मागे घेण्यासंदर्भात अनेकजण विनंती करत आहेत. पण केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे.

मनोज जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम झाल्‍यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्‍याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्‍ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्‍याने आता मर्यादा ओलांडली आहे. पंतप्रधान जेंव्‍हा महाराष्‍ट्रात येतील त्‍यावेळी जागेवरुन हलून दाखव ! तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत !, अशा तिखट शब्दांत नारायण राणे यांनी मनोज जरांगेंवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष शेलार…; भाजप प्रवेशानंतर बोलताना अशोक चव्हाणांकडून चूक, फडणवीसही हसून बेजार

छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन समाजाचे राजे, Chhagan Bhujbal यांचे मोठे वक्तव्य

Rajya Sabha Elections | राज्यसभेसाठी शरद पवार मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत, छत्रपती शाहू महाराजांना देणार उमेदवारी!