संजय राऊत यांच्या विरोधात मेधा किरीट सोमय्या यांनी मानहानीचा खटला दाखल केला

मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा वाद आता न्यायालयात पोहचला आहे. संजय राऊत यांच्या विरोधात मेधा किरीट सोमैया (Medha Kirit Somaiya) यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे. हा खटला शिवडी, मुंबई कोर्टात दाखल करण्यात आला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी दहशत/भीती निर्माण करण्यासाठी, मला बदनाम करण्यासाठी ₹100 कोटी शौचालय घोटाळ्याचे (Toilet scam) खोटे आरोप करीत आहेत त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी असा खटला प्रा. डॉ. मेधा किरीट सोमैया यांनी आज शिवडी, मुंबई कोर्टात दाखल केला.

भारतीय दंड संहिता कलम ४९९ व ५०० च्या अंतर्गत संजय राउत यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी विनंती शिवडी येथील मेट्रोपॉलिटन मेजिस्ट्रेट (Metropolitan Magistrate) २५ नं. न्यायालय येथे प्रा. डॉ. मेधा सोमैया यांनी केली. न्यायालयाने याचिका/तक्रार (Complaint) दाखल करून घेतली आहे. प्रक्रिया प्रारंभ झाली. पुढची तारीख सुनावणी २६ मे. ऍड विवेकानंद गुप्ता, ऍड लक्ष्मण कनाल, ऍड अनिल गलगली नी सोमैया यांची बाजू मांडली