‘ठाकरे सरकार मधल्या ओबीसी नेत्यांनी लाज असेल तर राजीनामे देऊन बाहेर पडावं’

मुंबई – सुप्रीम कोर्टानं मध्य प्रदेशला OBC आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका (Local body elections) घेण्यास परवानगी दिलीय. तसंच एका आठवड्याच्या आत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करा असे आदेश कोर्टानं मध्य प्रदेश निवडणूक आयोगाला (To the Madhya Pradesh Election Commission) दिले आहेत.

निवडणुकांना परवानगी देताना कोर्टानं एक अट घातली आहे. हे आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसावं असं कोर्टाने म्हटलंय. ए. एम. खानविलकर (A. M. Khanwilkar) यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलाय. हा निर्णय शिवराज सिंह चौहान ( Shivraj Singh Chouhan) सरकारसाठी मोठा विजय मानला जातोय.

दरम्यान, आता या निकालानंतर राज्यात विरोधक आणि सत्ताधारी पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. भाजप नेते निलेश राणे (BJP leader Nilesh Rane) यांनी यावरून ठाकरे सरकारवर (MVA) टीका केली आहे. ठाकरे सरकारचं तोंड पुन्हा एकदा काळं झालं आहे. फालतू टाईमपास (Timepass) करण्यामध्ये या सरकारचा वेळ जातो आणि अक्कल गुडघ्यात असल्यामुळे समाजहिताची कामं याना जमणार नाही. ठाकरे सरकार मधल्या ओबीसी नेत्यांनी (OBC leader) लाज असेल तर राजीनामे देऊन बाहेर पडावं नाही तर समाज तुम्हाला माफ करणार नाही. असा घणाघात राणे यांनी केलाय.