पुण्यात पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, सीसीटीव्हीत धक्कादायक घटना कैद

Pune Parking Dispute: पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर पुणे शहरात खळबळ (Pune Crime) उडाली आहे. महिलेवर ज्वलनशील द्रव ओतले जात असून तिला जाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. सुदैवाने महिला घटनास्थळावरून पळून गेल्याने मोठा अपघात टळला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील खराडी परिसरात एका महिलेचा पार्किंगवरून वाद झाला होता. मात्र हा वाद पुढे जाऊन शिगेला पोहोचला. दहा ते पंधरा जणांनी महिलेच्या गाडीची तोडफोड केली. यानंतर कारच्या काचा फोडण्यात आल्या. दरम्यान, पीडितेच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला, महिलेने घटनास्थळावरून पळ काढला. सांडलेल्या पेट्रोलमुळे कारला आग लागली, ज्यात कारची सीट जळाली. सुदैवाने महिलेचे प्राण वाचले.

महत्वाच्या बातम्या-

ऐतिहासिक! रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताचा इंग्लंडवर सर्वात मोठा विजय, ४३४ धावांनी जिंकली कसोटी

Sunetra Pawar | सुप्रिया सुळे यांच्यासमोर आव्हान निर्माण करणाऱ्या सुनेत्रा पवार नेमक्या कोण आहेत?

Ambernath | धक्कादायक ! चोरीच्या संशयातून दोन तरुणांना जमावानं बेदम मारहाण करून संपवलं