दिलदार मोहम्मद शमी! भारतीय गोलंदाजाने वाचवले कार अपघात झालेल्या तरुणाचे प्राण

Mohammed Shami Rescues Road Accident Victim: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने नैनिताल येथे रस्ता अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. शमीने या अपघाताचा व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना शमीने लिहिले की, तो खूप भाग्यवान आहे की देवाने त्याला दुसरे आयुष्य दिले आहे.

विश्वचषक संपल्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाज रजेवर गेले आहेत. सध्या मोहम्मद शमी उत्तराखंडमध्ये आहे. नैनितालला जाताना शमीने रस्ता अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला मदत करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. शमीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो रस्त्यावर अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करताना दिसत आहे, ज्याची कार रस्त्यावरून घसरली होती.

बचावाचा व्हिडिओ शेअर करत शमीने लिहिले की, “तो खूप भाग्यवान आहे की देवाने त्याला दुसरे जीवन दिले. त्याची कार नैनितालजवळ डोंगरी रस्त्यावर माझ्या कारच्या अगदी समोर पडली. आम्ही त्याला सुखरूप बाहेर काढले.” शमीच्या या दिलदारपणाे चाहते कौतुक करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

आगामी टी२० विश्वचषकात हार्दिक पंड्याकडे नेतृ्त्व देऊ नये, ‘हा’ खेळाडू असेल सर्वोत्तम पर्याय

अमिताभ बच्चन यांनी मुलीला भेट दिला ५६ कोटींचा बंगला, आता ‘बिग बी’ कुठे राहणार?

दादासमोर नाक उचलून…; रुपाली चाकणकरांचा कवितेतून सुप्रिया सुळेंवर निशाणा