Muralidhar Mohol | पुणे लोकसभा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची घेतली सदिच्छा भेट

पुणे | पुण्यातून महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांची त्यांच्या सिल्व्हर रॉक्स या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन सत्कार स्विकारला . यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी त्यांना महावस्त्र , पुष्पगुच्छ आणि श्री महालक्ष्मी देवीची प्रतिमा भेट देत निवडणुकीत भरघोस मतांनी विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी, ऊद्योजक रेखा चोरगे, माजी नगरसेविका सोनाली लांडगे, रंजना कुलकर्णी, पुणें शहर महिला सहसंपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, शिवसेना ऊपशहर प्रमुख श्रुती नाझीरकर, श्रद्धा शिंदे, सुप्रिया पाटेकर, मंगल सोनटक्के, युवराज शिंगाडे, राजू विटकर, सुधीर जोशी शिवसेना कार्यालय सचिव , संतोष लांडगे, शिवसेना ऊपशहरप्रमुख संजय डोंगरे, धैर्यशील कदम, संकेत मोरे, संजय तुरेकर, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

याभेटीवेळी उपस्थित शिवसैनिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत श्री. मोहोळ यांचा विजय मताधिक्यांचा विक्रम निश्चितपणे गाठेल अशी भावना व्यक्त केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आमची लढाई – Muralidhar Mohol

Eknath Shinde | मोदींना औरंगजेबाची उपमा देणं म्हणजे देशद्रोह, एकनाथ शिंदे यांचा संजय राऊत यांच्यावर हल्ला

Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर होताच पुण्यातील कॉंग्रेसमधील जेष्ठ नेता नाराज