कामगार, शेतकरी यांच्या प्रश्नांसाठी लढणारे झुंजार नेते प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन

कोल्हापूर: शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील (N D Patil) यांचं वयाच्या 93 व्या वर्षी निधनं झालं आहे. त्यांच्या निधनानं राज्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्त्व हरपलं आहे. प्रकृती बिघडल्यानं कोल्हापूरमधील (Kolhapur) खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

एन.डी. पाटील यांच्या निधनामुळं राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं असून कोल्हापूरवर शोककळा पसरली आहे. प्रकृती बिघडल्याने गेल्या चार दिवसा पासून कोल्हापूर मधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना लागण झाली. मात्र या वयातही एन.डी. पाटील यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. मात्र यावेळी त्यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांच्या अनेक प्रश्नांसाठी ते कायम लढत राहिले.