Nana Patole accident | अपघातानंतर खुद्द नाना पटोलेंनी सांगितला घटनाक्रम; म्हणाले, “ट्रकने मुद्दाम आमच्या गाडीला…”

Nana Patole accident | काल रात्री काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या गाडीचा भीषण अपघाात झाला. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावात त्यांच्या गाडीला ट्रकने धडक दिल्याने गाडीचा चुराडा झाला आहे. सुदैवाने नाना पटोले या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. नाना पटोलेंनी यासंदर्भात जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून हा घातपात होता की नाही? हे लवकरच समजेल असे म्हटले आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांचा प्रचार करून माघाडी परतत असताना रात्री सुकळी या गावी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. मागून ट्रक वेगाने आला आणि नाना पटोलेंच्या गाडीला धडकला. यावेळी नाना पटोले गा़डीतच बसून होते. ट्रकने जोराने धडक दिल्याने गाडीचा मागील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. सुदैवानं नाना पटोले (Nana Patole accident) आणि गाडीतील इतर कोणालाही कोणतीही दुखापत झालेली नाही. सर्व जण सुरक्षित आहेत.

या अपघातासंदर्भात माहिती देताना नाना पटोले म्हणाले, “काल भंडाराजवळ एका ट्रकने मुद्दाम आमच्या गाडीला धडक मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे गाडी पूर्ण एका बाजूला घासत गेली. या घटनेत आम्ही सुखरूप बचावलो पण गाडीचे नुकसान झाले. जनतेचा आशीर्वाद आणि प्रेमामुळे आज मी सुखरुप आहे. पण हा घातपात आहे की नाही, त्या पद्धतीने पोलीस चौकशी करतील. या घटनेची तक्रार आम्ही पोलिसांत दिली आहे”, असे नाना पटोले म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; पहा कुणाला मिळाली संधी

Ravindra Dhangekar | आघाडीत बिघाडी : पुण्यात शिवसेना उबाठाचा रविंद्र धंगेकरांच्या प्रचाराला ‘जय महाराष्ट्र’

Nana Patole Accident: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भीषण अपघात, गाडीचा चुराडा