आमच्या गृहमंत्र्यांना फडतूस बोलणारे उद्धव ठाकरे हे महाफडतूस आहेत; नारायण राणेंनी डागली तोफ

mumbai- ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे-पवार यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याप्रकरणी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जीभ घसरली. उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फडतूस गृहमंत्री म्हणत त्यांच्यावर टीका केली. यानंतर भाजपा नेते आक्रमक झाले असून त्यांनी उद्धव ठाकरेंना धारेवर धरले आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनीही उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे. ते भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

उद्धव ठाकरेंच्या फडतूस या टीकेवर बोलताना नारायण राणे म्हणाले, आमच्या गृहमंत्र्यांना फडतूस बोलणारे उद्धव ठाकरे हे महाफडतूस आहेत. महाराष्ट्राच्या अजिबात कामाचा नाही भाजपच्या कार्यकर्त्यांना यापुढं वाकडंतिकडं बोललास तर फडतूस काय असतो ते दाखवून देईन. सगळं करूनही तू तुरुंगाबाहेर राहिलास याचं कारण बाळासाहेब ठाकरे हे आहेत. नाहीतर कधीच बाहेर राहिला नसतास, असा इशारा राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला.