Bacchu Kadu | या निवडणुकीत नवनीत राणा चौथ्या क्रमांकावर घसरणार, बच्चू कडूंचा ‘प्रहार’

Bacchu Kadu vs Navneet Rana | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana) यांचे व प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू ( Bacchu Kadu) यांचे वैर सर्वश्रुत आहे. नवनीत राणा यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून बच्चू कडू सातत्याने त्यांच्यावर टीका करत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा त्यांनी नवनीत राणांवर हल्ला चढवला आहे.

काल नवनीत राणा यांनी अमरावती येथून उमेदवारी अर्ज भरला. यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांची या निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर घसरण होईल, असे म्हणत टीकास्त्र सोडले.

पत्रकारांना प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले, “आमच्या उमेदवाराचा अर्ज भरताना फक्त गर्दी नव्हे तर दर्दी लोकही होते. त्यांच्याकडे गर्दी आहे पण त्यांना निम्मी मतेही मिळणार नाहीत. मला नाही वाटत की, त्यांना तिसऱ्या क्रमांकाचीही मते मिळतील. त्यांना आनंदराज आंबेडकर यांच्यापेक्षाही कमी मते मिळतील. आणि त्या चौथ्या क्रमांकावर घसरतील.”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत