Prakash Raj | ‘मला विकत घेण्याइतके ते श्रीमंत नाहीत’, भाजप प्रवेशाच्या चर्चांवर प्रकाश राज यांचा पूर्णविराम

Prakash Raj | अलीकडच्या काळात मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींनी राजकारणात प्रवेश केला आहे. या सेलिब्रिटींना खूप प्रसिद्धीही मिळाली आहे. कंगना राणौतनंतर (Kangana Ranaut), २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रकाश राज भाजपमध्ये सामील झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या आहेत. काल अभिनेत्याने या अफवांवर मौन सोडले आहे. त्याने X वर एक पोस्ट करून आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे.

२०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये प्रवेश करण्याच्या अफवांवर अभिनेता प्रकाश राज यांनी मौन सोडले आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांना उत्तर देताना त्यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे सध्या सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

प्रकाश राज (Prakash Raj) हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात आणि जगासमोर त्यांचे मत व्यक्त करण्यास ते कमी पडत नाहीत. आपल्या ट्वीटमध्ये प्रकाश राज म्हणाले की, ‘मला वाटतं त्यांनी प्रयत्न केला असेल. पण, नंतर त्यांना कळलं असेल की ते इतके श्रीमंत(वैचारिकदृष्ट्या) नाहीत की मला विकत घेऊ शकतील. तुम्हाला काय वाटतं?’

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत