पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचा देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

पुणे : राज्यात सत्तांतर झाल्यापासून राजकारणातील वारं फिरलं असून महाविकास आघाडीतून आता आउटगोइंग सुरु झाले आहे. अनेक मोठे नेते भाजप (BJP) आणि शिंदे गटात (Shinde Government) प्रवेश करत असून पुण्यात (Pune) देखील आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठा धक्का बसला आहे.

माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि भाजपचे (BJP)  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. रेखा टिंगरे (Rekha Tingare) या कळस धानोरी प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन वेळेस नगरसेविका राहिल्या आहेत.

रेखा टिंगरे ह्या 2007, 2012,2017 ह्या सलग तिन वेळा धानोरी-विश्रांतवाडी भागातून निवडून येत आहेत. रेखा टिंगरे यांची कन्या कोमल कुटे-टिंगरे ,पती यांनीही यापुर्वीच भाजपात प्रवेश केला होता. रेखा टिंगरे ह्या केवळ पक्षांअंतर्गत कायदा मुळे त्या राष्ट्रवादीत होत्या. आता नगरसेवकपदाचा कार्यकाळही पुर्ण झाल्याने त्यांनी प्रवेश केला.