राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या त्रासाला कंटाळून युवती विभागाच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

बुलडाणा – राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या नेतृत्वात राज्यात युवती एकत्रित आणून त्यांचा विशेष सेल (Special cell) तयार करण्यात आला आहे. त्यांच्या युवती एकत्रित आणण्याच्या संकल्पाला बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यात घरघर लागली असल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड नाझेर काझी (Ad Nazer Qazi) यांच्या अपमानित वागणुकीला कंटाळून युवती जिल्हाध्यक्ष अॅड मीरा बावस्कर (Ad Mira Bawaskar) यांनी आपल्या युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा (Resigned) दिला आहे. जिल्ह्याचे नेते आणि पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Guardian Minister Dr. Rajendra Shingane) यांच्याकडे सोपविला आहे.

अॅड. बावस्कर म्हणाल्या, गेली दहा वर्षे पद रिक्त होते. शुन्यातून तयारी करावी लगाली. महिलांच्या कार्यशाळा (Workshop) घेतल्या. जिल्ह्यातील तेरा तालुके पिंजून काढले. महिलांना मार्गदर्शन केलं. तरीही जिल्हाध्यक्ष हे सतत अपमानीत करत होते. त्यांच्या वागण्याला कंटाळून पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडं पदाचा राजीनामा दिला आहे. ते अंतीम निर्णय घेतील. राष्ट्रवादीचे नेते आमचे दैवत आहेत, असंही त्या म्हणाल्या. युवती संघटना  (Yuvati Sanghatana) सोपी वाटत होती तर गेली दहा वर्षे हे पद रिक्त का होतं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.