“छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान..”, गोविंदगिरी महाराजांच्या विधानावर रोहित पवारांची टीका

Rohit Pawar On Govindgiri Maharaj:- अयोध्येतील प्रभू रामाच्या प्राण प्रतिष्ठा सोहल्यानंतर बोलताना गोविंदगिरी महाराज यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख करून त्यांच्या त्याग आणि समर्पण वृत्तीचे दाखले दिले. पंतप्रधान मोदींना प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी ३ दिवसांचा उपवास पकडण्यास सांगितले होते, तरीही त्यांनी ११ दिवसांचा उपवास केला, असे सांगताना गोविंदगिरी महाराजांनी छत्रपती शिवरायांचा दाखला दिला.

“आज या ठिकाणी मला एका राजाची आठण होत आहे, ज्यात हे सर्व गुण होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. लोकांना कदाचित माहीत नाही, छत्रपती शिवाजी महाराज स्वतः मल्लिकार्जूनच्या दर्शनासाठी श्रीशेलम येथे गेले होते. तेव्हा त्यांनी तीन दिवसांचा उपवास केला होता. ते तीन दिवस शिवमंदिरात राहिले. त्यावेळी दर्शन घेतल्यानंतर महाराजांनी सांगितले की, मला राज्य नाही करायचे. मला भगवान शिवाची सेवा करायची आहे. पण त्यांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी महाराजांची समजूत घातली आणि राज्य करणे ही देवाची सेवाच आहे, असे सांगितले.”

शिवाजी मानकर

आज मला स्वामी समर्थ महाराज यांचीही आठवण होत आहे. त्यांनी शिवाजी महाराजांचे वर्णन करताना म्हटले, “निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू… श्रीमंत योगी, श्रीमंत योगी”. आज आपल्याला पंतप्रधान नरेंद्र यांच्या रुपाने असाच एक श्रीमंत योगी प्राप्त झाला आहे, अशी भावना गोविंदगिरी महाराजांनी व्यक्त केली.

यावर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेतला आहे. आपण इतिहासाचे दाखले देताना चुकत आहात, प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या एवढ्या मोठ्या पवित्र आणि प्रतिष्ठीत व्यासपीठावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं वक्तव्य जाणं योग्य नाही.

छत्रपती शिवाजी महाराज धार्मिक होतेच पण त्यांनी कधीही संन्यास घेण्याचा विचार केला नाही. त्यांनी केवळ आपल्या कर्तव्याला म्हणजेच स्वराज्य स्थापनेला सर्वोच्च महत्व दिलं. शिवरायांचं स्वराज्य म्हणजेच रयतेचं राज्य हे रामराज्याला साजेसं असं सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवणारं होतं. शेतकरी, बारा बलुतेदार संपन्न होते, महिला-भगिनी सुरक्षित होत्या, द्वेषाला कुठलीही जागा नव्हती आणि या स्वराज्याची प्रेरणा व मार्गदर्शक केवळ आणि केवळ माँसाहेब जिजाऊ आणि सर्वसामान्य रयत होती. त्यामुळे आपली वक्तव्ये आपण त्वरित मागे घ्यावीत, अशी विनंती रोहित पवार यांनी केली.

महत्वाच्या बातम्या-

Ram Mandir Ayodhya : संपूर्ण पुणे शहर बनले राममय; धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचं आयोजन

Ram Mandir Ayodhya : रामाने रावणाचा नि:पात करण्याचा निश्चय केला त्या मंदिरात मोदींनी केली महापूजा

Santosh Shelar | माओवाद्यांशी संबंधित पुण्यातील बेपत्ता संतोष शेलार परतला; रुग्णालयात दाखल

आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करणं हीच प्रभू श्रीरामाची खरी पूजा; सावित्रीच्या लेकींनी नाकारली प्राणप्रतिष्ठेची सुट्टी