गुलाबराव पाटलांना मंत्रीपदावरून परत टपरीवर चुना लावायला बसावं लागणार – रुपाली पाटील

जळगाव – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Water Supply and Sanitation Minister Gulabrao Patil)  यांनी केलेल्या एका विधानावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे. स्त्रीरोग तज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही, असं गुलाबराव पाटील यांनी एक जाहीर कार्यक्रमातील भाषणात म्हटलं आहे. यावरून पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील (NCP leader Rupali Patil) यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

रुपाली पाटील म्हणाल्या, गुलाबराव पाटील हे मूळ व्यवसायाने पानाला चुना लावणारे आहेत. कुठलाही व्यवसाय वाईट नसतो, परंतु पानटपरी ते मंत्रीपदार्यंतचा जो प्रवास आहे. त्यामध्ये त्यांच्या बुद्धीचा विकास झालेला दिसत नाही. आपण कोणत्या कार्यक्रमात कुठलं उदाहरण देतोय, याचं भान मंत्र्यांनी ठेवलं पाहिजे.

जे हे गद्दार मंत्री आहेत यांना कुठलाही बुद्धीमत्तेचा किंवा महाराष्ट्राच्या विकासाचं कोणतंही एक धोरण जर तुम्ही दाखवलं, तर मी म्हणाल ते हारेल. पुन्हा गुलाबराव पाटलांना म्हणजे त्यांनी जे वक्तव्य केलं, की स्त्री रोग तज्ज्ञ हे हातपाय बघत नाहीत म्हणजे हा काय तर्क झाला. मला वाटतं ते हातपाय नसू दे बघत पण तुम्हाला येणाऱ्या भविष्यकाळात परत मंत्रीपदावरून पानटपरीवर चुना लावायला बसावं लागणार आहे.

काय उदाहरण देताय, काय आदर्श ठेवताय अक्षरशा लाजीरवाणी गोष्ट आहे. कुणाचे दौरे कसे असतात, कुणाचं वक्तव्यं काय आहे. मुख्यमंत्री शिंदेंना मला विचारायचं आहे की, अशी अडाणी लोक घेऊन तुम्ही महाराष्ट्र चालवणार आहात का? की जे सतत वाक्यातून, कृत्यातून महाराष्ट्राचा, महिलांचा अपमान होईल. असं सातत्याने करणाऱ्या लोकांपासून खरंच महाराष्ट्र वाचवला पाहिजे आणि धन्य आहेत गुलाबराव पाटील तुम्ही परत चुना लावायला टपरीवर या.” असंही रुपाली पाटील यांनी यावेळी बोलून दाखवलं.