‘अजित पवार म्हणजे ‘राजकारणातील सिंह’ असून त्यांना ‘लांडग्या-कोल्हयांच्या’ टोळीत समावेश होण्याची आवश्यकता नाही’

मुंबई – अजित पवार (Ajit Pawar) हे राज्याच्या ‘राजकारणातील सिंह’ आहेत त्यामुळे त्यांना लांडग्या – कोल्हयांच्या टोळीत समावेश होण्याची आवश्यकता नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी दिपक केसरकर (Dipak Kesarkar) यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

मंत्री दिपक केसरकर आणि भाजप आमदार प्रविण पोटे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा महेश तपासे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अजित पवार हे नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार मात्र ‘वक्त भी हमारा होगा और पार्टी भी राष्ट्रवादी होगी’ असेही महेश तपासे यांनी आमदार प्रविण पोटे यांना सुनावले आहे.