जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीने पार केला रोटी घाट

दौंड –   मार्गावरील पालखी मार्गावरील अवघड टप्पा म्हणून रोटी घाटाकडे पाहिले जाते . घाटाच्या पायथ्याला पालखीस आणखी सहा बैलजोड्या जोडण्यात आल्या होत्या . संपूर्ण रोटी घाट वारकर्‍यांनी भरून गेला होता पावसाच्या सरी कोसळत असताना पालखीने हा घाट पार केला.

पाटस येथील श्री नागेश्वर महाराज मंदिरातील विसाव्या नंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान रोटी घाटाच्या दिशेने झाले. पाटस आणि परिसरातील अनेक भाविक संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत रोटी घाट पार करण्यासाठी आले होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास संत तुकाराम महाराजांची पालखी रोटी घाटात दाखल झाली. यावेळी रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती .घाटाच्या पायथ्याला पालखीला सहा बैल जोड्या जोडण्यात आल्या . पालखीला बैल जोड्या जोडल्यानंतर रोटी घाट चढण्यास सुरुवात केली .

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी रोटी घाट पार करीत असताना, हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती . आवघड टप्पा असुनही वारकऱ्यांचा अनोखा उत्साह घाट पार करताना दिसून आला . पालखीने घाट पार केला घाट पार केल्यानंतर घाट माथ्यावर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अभंग आरती घेण्यात आली. या नंतर पालखीने पुढील टप्प्याकडे मार्गक्रमण केले .

यानंतर पालखी सोहळा रोटी , हिंगणीगाडा , वासुंदे आदी ठिकाणी विसावा घेत पालखी सोहळ्याचे प्रस्थान दौंड तालुक्यातुन बारामती तालुक्यात झाले . पालखीचा
आजचा पालखीचा मुक्काम बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी येथे आहे .