Nikhil Wagle Car Attack : भारतरत्न लालकृष्ण अडवाणी (Lalkrishna Advani) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagle) हे भाजपाच्या रडारवर आहेत. अशातच नुकताच पुण्यात निखील वागळे यांच्या गाडीवर हल्ला देखील (Nikhil Wagle Car Attack)झाला आहे.
काही संतप्त कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. तसेच त्यांच्या गाडीवर शाईफेक देखील करण्यात आली आहे. संबंधित प्रकरामुळे एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान, या हल्ल्यानंतर देखील वागळे यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्ये सुरूच असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आता वागळे यांना भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी फैलावर घेतले आहे.
ते म्हणाले, महाविकास आघाडीची सुपारी घेत , पत्रकार निखिल वागळे नी पुण्यात कार्यकम घेतला . त्यांच्यावर झालेल्या ह्ल्याच आम्ही समर्थन करत नाही, पण वागळेना माझा सवाल ?भाजपाचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार दिला तुमच्या बुडाला आग लागली. माजी पंतप्रधान PV नृसिंहराव , शेतकरी नेता चरणसिंग चौधरी यांना भारतरत्न जाहिर झाल्या नंतर तुमची दाताखिळी का बसली असा सवाल भाजपा राज्य प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :
कॉंग्रेसचे नेते Baba Siddique यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; उपमुख्यमंत्री पवार यांनी केले स्वागत
Nikhil Wagle व सहकाऱ्यांवर पुण्यात प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – पृथ्वीराज चव्हाण
Chhagan Bhujbal | तुमची 5 लोकांनी सुपारी घेतलीये, ५० लाखांची …; छगन भुजबळांना पुन्हा एकदा धमकी