नितेश राणे  यांनी सरळ पोलिसांना शरण जावं आणि केलेल्या गुन्ह्याची कबुली द्यावी – राऊत

मुंबई – शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी (santosh parab) भाजप नेते नितेश राणे (nitesh rane) यांना सर्वोच्च न्यायालयातही (suprem court) दिलासा मिळाला नाही. येत्या दहा दिवसात न्यायालयासमोर हजर व्हा आणि नियमित जामीन घ्या, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.

कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण येण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे. तोपर्यंत नितेश राणेंना अटक करता येणार नाही. शरण झाल्यानंतर नितेश राणे नियमित जामिनसाठी अर्ज करु शकतात. नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयातही नितेश राणेंना जामीन नाकारण्यात आला. त्यानंतर नितेश राणेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाकडूनही नितेश राणे यांना दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने नितेश राणेंना योग्य कोर्टात दाद मागावी असा सल्ला दिला.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयानंतर  आमदार नितेश राणे ( Supreme Court On Nitesh Rane Bail Application ) यांनी सरळ पोलिसांना शरण जावं आणि केलेल्या गुन्ह्याची कबुली द्यावी. हे माझ्यादृष्टीने एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यासाठी सांगणं आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार विनायक राऊत ( MP Vinayak Raut On Nitesh Rane ) यांनी दिली आहे.खासदार राऊत म्हणाले की, उगाच कायद्यापासून पळत जाऊ नका. अशा पळवाटा शोधण्यापेक्षा कायद्याला शरण जा आणि केलेल्या गुन्ह्याची कबुली द्या, असा सल्लाही शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे यांना दिला आहे.