Train Accident  : North East Expressचे आठ डबे रुळावरून घसरल्यामुळे भीषण अपघात,मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

 North East Express Train Accident  :बिहारमध्ये काल रात्री बक्सर जिल्हयातील रघुनाथपूर रेल्वेस्थानकाजवळ (Raghunathpur Railway Station in Buxar District) ईशान्य जलदगती एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरून घसरल्यामुळे चार प्रवाशांचा मृत्यू झाला, तर शंभरपेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले. रात्री नऊ वाजून 35 मिनिटांनी हा अपघात झाला.

ही रेल्वे नवी दिल्लीहून गुवाहाटीकडे निघाली होती. आकाशवाणीशी बोलताना बक्सरचे जिल्हाधिकारी अन्शुल अगरवाल यांनी या माहितीला दुजोरा दिला. अपघात स्थळी मदतकार्य वेगानं सुरू आहे. गंभीर जखमींना पाटण्यातील एम्समध्ये नेलं जात आहे. सुमारे दहा रुग्णवाहिका तैनात असून, अपघाताची तीव्रता बघता मृत्यूंची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

राज्य आपत्ती निवारण दलाचे जवान मदतीसाठी तैनात करण्यात आले आहेत. अपघातामुळे रेल्वेंच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला आहे. पुणे-दानापूर एक्स्प्रेस, लोकमान्य पाटलीपुत्र एक्स्प्रेस, आनंदविहार भागलपूर विक्रम शीला एक्स्प्रेससह सुमारे 18 रेल्वेंचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

मंदबुद्धी मूल जन्माला येऊ नये यासाठी कोणती चाचणी करावी? वेळेत केला जाऊ शकतो उपचार

वाराणसीमध्ये आहे हनुमानजींचे भव्य-दिव्य मंदिर, ‘संकट मोचन हनुमान मंदिरा’चे महत्त्व घ्या जाणून

भाजप खासदाराचा मुलगा पोस्टमन बनून घरोघरी पत्रे पोचवायला गेला, तेव्हा लोकांची होती ‘ही’ प्रतिक्रिया