इंदापूर विधानसभेवरुन कलगीतुरा, भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने

Indapur Vidhan Sabha: लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections 2024) पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदार संघातील वातावरण तापू लागले आहे. महायुतीकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा पराभव करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु असताना इंदापुरात मात्र काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. या ठिकाणी महायुतीत एकवाक्यता नसल्याचे दिसून येत असून भरणे-पाटील यांच्यात शीतयुद्ध सुरु झाले आहे.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता आणि पूत्र राजवर्धन यांनी रणशिंग फुंकले आहेत. विधानसभेला जो आम्हाला मदत करेल त्यालाच आम्ही लोकसभेत मदत करू असे हर्षवर्धन पाटील यांच्या मुलांनी म्हटले आहे. 2024 इंदापूर विधानसभा हर्षवर्धन पाटीलच लढणार असल्याचे त्यांचे पूत्र राजवर्धन यांनी म्हटले आहे.

‘आम्ही आधी महाआघाडीत होतो. आता महायुतीत आहोत. ह्यांनी मागील तीनही वेळेस शब्द देऊन फिरविलेला आहे. आमची फसवणूक केलेली आहे. आमच्या पाटीत खंजीर खुपसला आहे. या वेळेस जे कोणी उमेदवार असतील आमचं जे कोणी विधानसभेत काम करेल त्यांचे आम्ही लोकसभेत काम करू’, असे हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी म्हटले आहे.

यावर आता नवीन जनरेशनला लगेच उत्तर देण्याचे काही कारण नाही असे राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, दोन्ही बाजूचे नेते आगामी काळात काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

ऐतिहासिक! रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताचा इंग्लंडवर सर्वात मोठा विजय, ४३४ धावांनी जिंकली कसोटी

Sunetra Pawar | सुप्रिया सुळे यांच्यासमोर आव्हान निर्माण करणाऱ्या सुनेत्रा पवार नेमक्या कोण आहेत?

Ambernath | धक्कादायक ! चोरीच्या संशयातून दोन तरुणांना जमावानं बेदम मारहाण करून संपवलं