कुख्यात गुन्हेगार मंगेश कदम अखेर हवेली पोलिसांना शरण

Pune  : खुन, खुनाचा प्रयत्न, मारामारी, दहशत निर्माण करणे, बेकायदा जमाव जमविणे, खंडणी असे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल असलेला एम.के. कंपनीचा (M.K.Company) म्होरक्या कुख्यात गुन्हेगार मंगेश उर्फ भाईजी कदम (Mangesh Kadam) अखेर हवेली पोलीसांना शरण आला आहे. ( Criminal Mangesh Kadam finally surrendered to Haveli police) .

सुमारे तीन वर्षांपूर्वी सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत धायरी (Dhayari)  येथील सराईत गुन्हेगार हसन शेख (Criminal Hasan Sheikh) याचा खुन करण्यात आला होता. त्याचा आरोप मंगेश कदम व टोळीवर ठेवून सर्वांवर संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून मंगेश कदम फरार होता.

हवेली आणि सासवड पोलीस ठाणे (Haveli and Saswad Police Thane), ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा, शहर गुन्हे शाखा, एटीएसचे पथक (Squad of Rural Local Crime Branch, City Crime Branch, ATS) या सर्वांनीच मंगेश कदमला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र मोबाइलचा वापर तो करतनव्हता त्याचबरोबर राहण्याचे ठिकाणही सतत बदलत होता. त्यामुळे त्याचा शोध घेण्यात अडचणीनिर्माण होत होत्या. तो कोणाच्याही हाती लागत नव्हता. अखेर हवेली पोलिसांना मंगेश कदम  शरण आला आहे.