आई तुळजाई बळ दे, उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री कर – ओमराजे निंबाळकर

तुळजापूर – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज 62 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. सर्वपक्षीय नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.

दरम्यान, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी (MP Omraje Nimbalkar) उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त, पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान व्हावं, असं साकडं आई तुळजाभवानीकडे घातलं. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी एक जागृत देवस्थान मानलं जातं. येथील भावनीमातेला ओमराजे निंबाळकरांनी आज साकडं घातलं.

ज्या माणसाच्या घरात ग्रामपंचायत सदस्य नव्हता त्या माणसाला बाळासाहेब ठाकरेंनी आमदार आणि खासदार केलं. हे ऋण मी फेडू शकत नाही. पण मी मरेपर्यंत उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही. अडचणीच्या काळात साथ सोडणं चुकीचं आहे. शिवसेनेचा इतिहास आहे ज्यांनी ज्यांनी बंड केलंय त्यांना शिवसैनिकांनी जागा दाखवली आहे. आता शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवतील, अशी टीकाही ओमराजे निंबाळकर यांनी आमदार तानाजी सावंतांचं नाव न घेता केली.