बालकायद्यातील बदलासाठी ‘राउंड टेबल कॉन्फरन्स’ चे आयोजन

पुणे – सिंबबायोसिस लॉ स्कूल (Symbiosis Law School) पुणेच्या वतीनं ज्युवेनाईल जस्टिसमधील(Juvenile Justice)  कलम १५ अंतर्गत बाबींवर चर्चा करण्यासाठी खास राऊंड टेबल कॉन्फरन्सचे (Round Table Conference) आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कायद्याचा मसुदा आणि त्यावरील मार्गदर्शक तत्वे यावर सखोल चर्चा होणार असल्याची माहिती सिंबबायोसिस लॉ स्कूल कुलगुरु डॉ. शशिकला गुरपूर यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे.

16 जानेवारी सकाळी 10:00 ते दुपारी 2:00 यावेळेत ही परिषद होणार असून त्यामध्ये कायदा क्षेत्रातील विविध मान्यवर सहभागी होणार आहे. यात उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी, मार्गदर्शन करणार आहेत. याबरोरच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या स्कूल ऑफ लॉ च्या डॉ. आशा बाजपेई ज्युवेनाइल जस्टिस ऍक्टच्या कलम 15- आव्हाने आणि बदलाची गरज  (Section 15 of the Juvenile Justice Act- Challenges and Need for Change) यावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. तसेच समवादच्या डॉ. शीला रामास्वामी, मानसोपचारतज्ञ डॉ. हरीश शेट्टी आणि बाल हक्कांच्या अभ्यासक डॉ. जया सागडेही ( Dr. Sheela Ramaswamy, Harish Shetty and  Dr. Jaya Sagade)उपस्थितांशी पहिल्या सत्रामध्ये संवाद साधणार आहे.

दुसऱ्या सत्रामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. शिरीन मर्चंट बालकायद्यातील काही महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करणार आहेत. यानंतर राज्य मानवाधिकार आयोगाच्या सचिव डॉ.स्वरूपा, अॅड आणि बाल हक्क विषयातील पीएचडी स्कॉलर चैत्राली देशमुख बालकायद्यातील वेगवेगळ्या बदलांविषयीचा अहवाल कसा तयार करता येईल यावर बोलणार आहेत. त्यानंतर चर्चासत्राचा समारोप होईल. संबंधित चर्चासत्रातील महत्वाच्या सुचना, बदल आणि शिफारसी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडे पाठविण्यात येणार आहेत.