कुत्र्याचे मांस खायला आवडणाऱ्यांची होणार पंचाईत; नव्या कायद्यामुळे व्यापारी नाराज 

dog meat: कुत्र्याचे मांस खाण्याची परंपरा दक्षिण कोरियामध्ये (South Korea) गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे. येथील अनेकांना हे मांस खूप आवडते, यासाठी व्यापारी कुत्रे पाळतात आणि अनेक शेतकरीही या व्यवसायात गुंतलेले आहेत. मात्र, आता दक्षिण कोरियातील नवीन कायद्यामुळे हे मांस आणखी तीन वर्षेच लोक खाऊ शकतात. दक्षिण कोरियामध्ये कुत्र्याचं मांस विकण्यावर आणि त्यांच्या मांसासाठी कुत्रे पाळण्यावर बंदी आहे. नुकताच तिथल्या संसदेत हा कायदा मंजूर करण्यात आला आहे, त्याअंतर्गत 2027 पर्यंत देशात कुत्र्याच्या मांसावर बंदी घालण्यात येणार आहे.

जरी दक्षिण कोरियामध्ये असे बरेच लोक आहेत जे हे मांस खात नाहीत परंतु ते या कायद्याच्या विरोधात आहेत. हा कायदा देशाच्या संसदेत 208 संसद सदस्यांच्या संमतीने एकमताने मंजूर करण्यात आला आहे. संसदेत या कायद्याला कोणीही विरोध केला नाही, पण देशातील कुत्र्यांच्या मांसाच्या व्यापारात गुंतलेले लोक या कायद्यावर खूश नाहीत. या कायद्याविरोधात याचिका दाखल करण्याचा विचार करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दक्षिण कोरियामध्ये 2027 पासून लागू होणाऱ्या या कायद्यानुसार कुत्र्याचे मांस खरेदी करणाऱ्यांना दोन ते तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे, पण खाल्ल्यास कोणतीही शिक्षा नाही.  कोरियामध्ये अनेक दशकांपासून कुत्र्याचे मांस खाल्ले जात आहे, मात्र अलीकडे याला विरोध वाढला आहे.
या कायद्याच्या मसुद्यात म्हटले आहे की, एखाद्याच्या जगण्याच्या हक्काची मूल्ये समजून घेणे, जीवनाचा आदर करणे आणि मानव आणि प्राणी यांना एकत्र राहण्याची मुभा या उद्देशाने हा कायदा आणण्यात आला आहे. हा कायदा मंजूर झाल्यानंतर अनेक लोक संसदेबाहेर जमले होते आणि त्यांनी या कायद्याच्या बाजूने घोषणाही दिल्या.

महत्वाच्या बातम्या-

शंकराचार्यांचे हिंदू धर्मातील योगदान विचारणाऱ्या नारायण राणेंना नाशिकचे साधू महंत म्हणाले…

ओरीचा भलताच जोर; थेट तृप्ती डिमरीला मिठी मारत किस घेतल्यानं एकच चर्चा रंगली

इंडिया आघाडीतील जागावाटपाबाबत लवकरच चर्चा होणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार