कॉंग्रेसमधून आउटगोइंग सुरूच; २०१९ नंतर राहुल गांधींच्या ‘या’ जवळच्या मातब्बर नेत्यांनी सोडलाय पक्ष

Milind Deora Leaves Congress:- 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election 2024) अनेक बड्या नेत्यांनी काँग्रेस पक्ष सोडला. यामध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग, गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य सिंधिया यांसारख्या नेत्यांचा समावेश  आहे. राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) सुरू होण्यापूर्वीच महाराष्ट्रात पक्षाला मोठा झटका बसला आहे. मुंबईतील मोठे नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी काँग्रेसला राम राम ठोकला.

नोव्हेंबर 2021 मध्ये काँग्रेसच्या बड्या नेत्यांपैकी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पक्ष सोडला. ते पंजाबचे मुख्यमंत्री होते पण नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांनी पक्षाशी मतभेद झाल्यानंतर काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यांनी पंजाब लोक काँग्रेस नावाचा वेगळा पक्ष स्थापन केला आहे आणि २०२२ च्या विधानसभा निवडणुका भाजपसोबत लढल्या आहेत.

इंदिरा गांधींच्या काळापासून ते राहुल गांधींच्या युगापर्यंत काँग्रेसच्या बड्या नेत्यांपैकी एक असलेले गुलाम नबी आझाद यांनीही ऑगस्ट २०२२ मध्ये पक्षाचा निरोप घेतला होता. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आझाद यांनी डेमोक्रॅटिक आझाद पार्टी या नावाने वेगळा पक्ष स्थापन केला आहे.

जानेवारी 2022 मध्ये आरपीएन सिंह यांनीही काँग्रेस सोडली. झारखंड आणि छत्तीसगडचे प्रभारी असलेले सिंह यांनी नंतर भाजपचे सदस्यत्व घेतले. काँग्रेसला अलविदा करणाऱ्या इतर नेत्यांपैकी जितिन प्रसाद यांनी राजीनामा दिला आणि जून २०२१ मध्ये भाजपचे सदस्यत्व घेतले. सप्टेंबर 2021 मध्ये, गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइझिन्हो फ्ल्युरियो यांनी राजीनामा दिला आणि TMC चे सदस्यत्व घेतले. मेघालयचे माजी मुख्यमंत्री, मुकुल संगमा यांनी देखील राजीनामा दिला आणि नोव्हेंबर 2021 मध्ये TMC मध्ये सामील झाले.

फेब्रुवारी 2022 मध्ये निवडणुकीच्या आधी, अश्विनी कुमार, जे यापूर्वी केंद्रीय मंत्री देखील होते, त्यांनी राजीनामा दिला. आसाम काँग्रेसचे माजी प्रमुख रिपुन बोरा यांनी एप्रिल 2022 मध्ये काँग्रेसला अलविदा केला होता. ज्योतिरादित्य सिंधिया, जे कॉंग्रेसच्या मजबूत नेत्यांपैकी एक होते, त्यांनी मार्च 2020 मध्ये पक्ष सोडला होता. ते चार वेळा खासदार आहेत आणि सध्या भाजप सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री आहेत.

ऑगस्ट २०२१ मध्ये काँग्रेसच्या प्रवक्त्या सुष्मिता देव यांनीही पक्ष सोडला. मूळ बंगाली समुदायातील, सुष्मिता आणि तिच्या कुटुंबाचा आसाम तसेच त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रभाव आहे.  ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल, सुप्रीम कोर्टातील तगड्या वकिलांपैकी एक, यांनी देखील मे 2022 मध्ये काँग्रेसला निरोप दिला होता. काँग्रेस सरकारमधील माजी केंद्रीय मंत्री सिब्बल यांनीही राज्यसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती, ज्यांना समाजवादी पक्षाचा (एसपी) पाठिंबा मिळाला होता. मे 2022 मध्ये सुनील जाखर आणि पाटीदार समाजाचे प्रमुख नेते हार्दिक पटेल यांनीही काँग्रेस सोडली. सुनील जाखर आणि हार्दिक पटेल यांनी नंतर भाजपचे सदस्यत्व घेतले.

महत्वाच्या बातम्या-

शंकराचार्यांचे हिंदू धर्मातील योगदान विचारणाऱ्या नारायण राणेंना नाशिकचे साधू महंत म्हणाले…

ओरीचा भलताच जोर; थेट तृप्ती डिमरीला मिठी मारत किस घेतल्यानं एकच चर्चा रंगली

इंडिया आघाडीतील जागावाटपाबाबत लवकरच चर्चा होणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार