पक्षपाती कारवाया पाहून पवारांना अस्वस्थ वाटलं असेल; पवार मोदींच्या भेटीवर राऊत यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी नुकतीच दिल्लीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Sharad Pawar Pm Modi Meet) भेट घेतली. खासदार संजय राऊत (Ed Raid on Sanjay Raut) यांच्यावर ईडीने केलेली कारवाई, बारा आमदरांच्या नियुक्तीचा मुद्दा आणि लक्षद्वीपच्या प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती पवारांनी दिली.

संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेली कारवाई चुकीची आहे. संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची काय गरज होती? असा सवाल करत मोदींकडे पवारांनी या कारवाईची तक्रार केली.यावर संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत शरद पवारांचे आभार मानले आहेत.पक्षपाती कारवाया पाहून पवारांना अस्वस्थ वाटलं असेल म्हणूनच ते मोदींना भेटले असावेत असं राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर अशी कारवाई सुरू आहे. आता पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याने हे मोदींना सांगणं म्हणजे देशात ज्या ठिकाणी भाजपची सरकारं नाहीत. त्या सर्व विरोधी पक्षांचे हे प्रतिनिधीत्व आहे. शरद पवारांनी पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ संसदेत काम केलं आहे. त्यांच्या विचारांची उंची वेगळी आहे, त्यामुळे त्यांनी मोदींवर समोर विचार मांडले, हे अत्यंत महत्वाचे आहे, असेही राऊत म्हणाले.