घराबाहेर लावा ‘ही’ झाडे, डास तर फिरकणार नाहीतच पण तुम्ही बनू शकता  करोडपती

पुणे – महोगनी झाडांच्या (Mahogany tree) लागवडीमुळे शेतकऱ्यांना भरघोस नफा मिळत आहे. (mahogany tree plantation) तपकिरी लाकडासह या झाडाची साल, लाकूड आणि पाने बाजारात चांगल्या किमतीत विकली जातात. त्यामुळे शेतकऱ्याला करोडोंचा नफा मिळतो. तज्ज्ञांच्या मते, महोगनीच्या झाडांची लागवड करून शेतकरी केवळ 12 वर्षांत करोडपती होऊ शकतात.(How much benefit will be gained by planting mahogany trees?)

या झाडाच्या वाढीसाठी सुपीक माती आणि सामान्य पीएच मूल्य योग्य आहे. त्याची जंगले दीर्घकाळ टिकतात. पटकन खराब होत नाही. जहाजे, दागिने, प्लायवूड बनवण्यासाठी याचा अधिक वापर होतो. तज्ज्ञांच्या मते, हवेचा प्रवाह जोरदार असेल अशा ठिकाणी या झाडाची लागवड करू नका. या ठिकाणी त्याची झाडे नीट वाढू शकत नाहीत. म्हणूनच डोंगराळ प्रदेशात त्याची लागवड न करण्याचा सल्ला दिला जातो.(How to plant mahogany trees?)

महोगनी झाडे 12 वर्षांत लाकूड कापणीसाठी तयार होतात. त्याचे बियाणे एक हजार रुपये किलोपर्यंत बाजारात विकले जाते.(Mahogany  tree price )त्याच वेळी, त्याचे लाकूड 2000 ते 2200 रुपये प्रति घनफूट दराने मोठ्या प्रमाणात विकले जात आहे. (mahogany tree selling price in india) अशा परिस्थितीत शेतकरी मोठ्या प्रमाणावर लागवड करून चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला महोगनीची झाडे लावली असतील तर तिथे डास आणि किडे फिरकणार नाहीत. हे झाड औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. पाने आणि बियांचा वापर डासांना दूर करण्यासाठी आणि कीटकनाशक तयार करण्यासाठी केला जातो. (Benefits of mahogany trees) यामुळे डासांमुळे होणाऱ्या आजारांना तुम्ही बळी पडणार नाही. त्याची पाने आणि बियांपासून बनवलेले तेल साबण, रंग, वार्निश आणि अनेक प्रकारची औषधे बनवण्यासाठी वापरले जाते. झाडाची साल आणि पाने देखील अनेक रोगांवर वापरली जातात.