नरेंद्र मोदी पुन्हा वाराणसीतून निवडणूक लढवणार, लोकसभेसाठी भाजपकडून 195 उमेदवारांची घोषणा

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी ही यादी जाहीर केली आहे. विनोद तावडेंनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक समितीची बैठक 29 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) वाराणसीतून लोकसभेसाठी उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

विनोद तावडेंनी जाहीर केलेल्या जागा

उत्तरप्रदेश – ५१
पश्चिम बंगाल २०
मध्य प्रदेश – २४
गुजरात – १५
राजस्थान १५
केरळ – १२
तेलंगणा -९
आसाम -११
झारखंड – ११
छत्तीसगड -११
दिल्ली – ५
जम्मू काश्मीर – २
उत्तराखंड -३
अरुणाचल प्रदेश -२
गोवा -१
त्रिपुरा -१
अंदमान निकोबार – १
दमण दीव -१

महत्वाच्या बातम्या : 

विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी: Nana Patole

Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले

Muralidhar Mohol | मोहोळांनीही उघडले लोकसभेचे पत्ते; म्हणाले, ‘मी लोकसभेची तयारी करतोय, पण…’