Crime News | लग्नाच्या पहिल्याच रात्री शक्तीवर्धक गोळ्या खाऊन पती बनला हैवान, पत्नीचा 7 दिवसांत मृत्यू

Crime News : उत्तर प्रदेशमधील हमीरपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या आठवडाभरानंतर नवविवाहितेचा संशयास्पद अवस्थेत उपचारादरम्यान मृत्यू झाला. कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर अनैसर्गिक कृत्य (Crime News) आणि छळ केल्याचा आरोप करत एसपींकडे कारवाईची मागणी केली आहे. सोमवारी उत्तर प्रदेश येथील कानपूर शहरातील मोक्षधाम येथे मृत नवविवाहितेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृताच्या भावाने एसपीं ना दिलेल्या तक्रार पत्रात सांगितले की, त्याच्या बहिणीचे लग्न उराई येथील एका तरुणाशी 3 फेब्रुवारी रोजी झाले होते. सरकारी नोकरी असल्याने तिच्या भावानेही मोठ्या थाटामाटात 4 फेब्रुवारी रोजी बहिणीचे लग्न लावून दिले होते. त्यानंतर तिला सासरी पाठवण्यात आले होते. लग्न झाल्यानंतर लैंगिक क्षमता (Sexual ability) वाढवण्यासाठी गोळ्या घेऊन पतीने पत्नीबरोबर अनैसर्गिक पद्धतीने शरीर संबंध ठेवले होते. तिच्यावर अत्याचार केल्यामुळे तिची परिस्थिती गंभीर झाली होती. त्यामुळे नवविवाहितेची प्रकृतीही खालावली होती.

त्यावर 7 फेब्रुवारीला सर्वजण तिच्या सासरच्या घरी पोहोचले. मी माझ्या बहिणीचे पती आणि सासरे रामबाबू यांना तिच्यावर उपचार करण्यासाठी विचारले असता, त्यांनी तिच्यावर उपचार करून घेतल्याचे सांगितले. आता तुमची इच्छा असेल तर तुम्ही तिला उपचारासाठी घेऊन जाऊ शकता, असे त्यांनी म्हटले. त्यानंतर भाऊ तिला घेऊन उराई येथील रुग्णालयात गेला आणि डॉक्टरांनी तिला कानपूरला नेण्यास सांगितले. त्यावर त्यांनी 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 1.30 च्या सुमारास कानपूर येथील सर्वोदय नगर येथील विमल नर्सिंग होममध्ये दाखल केले.

यानंतर तिला ब्रिजराज हॉस्पिटल हमीरपूरमध्ये दाखवण्यात आले. जिथून तिला पुन्हा कानपूर दाखवण्यास सांगण्यात आले. अखेर तिला हॅलेट रुग्णालयात नेले असता दाखवले जात असताना तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. 11 फेब्रुवारीला कानपूरमध्ये नवविवाहितेचे पोस्टमार्टम करण्यात आले आणि सासरच्या लोकांना कळवण्यात आले, पण ते आले नाहीत आणि मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यासही तयार नव्हते. पीडितेच्या भावाने एसपीकडे सासरच्या सर्वांवर कारवाईची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

Medha Kulkarni | “..एवढीच मागणी मी पक्षाकडे केली होती”, राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया

Rajyasabha Election: राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल राज्यसभेवर जाणार

महायुतीच्या उमेदवारांची यादी पाहून किव येते, भाजपसाठी जीव ओतलेल्यांनाच जागा नाही – Nana Patole