प्रकाश आंबेडकर आता रिपब्लिकन राहिले नसून ते वंचित बहुजन झाले आहेत – जोगेंद्र कवाडे

मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दिवंगत एम डी शेवाळे सर हे रिपब्लिकन ऐक्य झाल्यावर माझ्या सोबत जोडले गेले. त्यांनी आपले आयुष्य रिपब्लिकन चळवळी वाहिले. रिपब्लिकन ऐक्य व्हावे ही त्यांची मनापासून ईच्छा होती. रिपब्लिकन ऐक्यव्हावे या साठी मी अनेकदा प्रयत्न केले आज ही मी ऐक्यासाठी तयार आहे मात्र प्रकाश आंबेडकर रिपब्लिकन ऐक्यात येत नसल्याने जनतेला अपेक्षित रिपब्लिकन ऐक्य होत नाही. रिपब्लिकन नेते एकत्र येत नसतील तर जनतेनेच एका नेत्यांची निवड करून त्यामागे एकजुटीने उभे राहिले पाहिजे असे सांगत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करणे हीच खरी दिवंगत एम डी शेवाळे सरांना खरी अदारांजली ठरेल असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

रिपब्लिकन ऐक्यासाठी रामदास आठवले यांनी पुढाकार घ्यावा मी रिपब्लिकन ऐक्यासाठी तयार आहे आसे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी यावेळी जाहीर केले. मात्र प्रकाश आंबेडकर यांना रामदास आठवले यांनी रिपब्लिकन ऐक्यासाठी आवाहन करू नये.प्रकाश आंबेडकर आता रिपब्लिकन राहिले नसून ते वंचित बहुजन झाले आहेत.रिपब्लिकनशी त्यांचा काही संबंध नसताना आपण त्यांना रिपब्लिकन ऐक्यासाठी का निमंत्रण द्यावे असा प्रश्न करून सर्व गटांना एकत्र करून रिपब्लिकन ऐक्य करावे हीच दिवंगत एम डी शेवाळे सरांना खरी श्रद्धांजली ठरेल असे यावेळी प्रा .जोगेंद्र कवाडे म्हणाले.

“रिपब्लिकन पक्षाला एकत्र ठेवण्यामध्ये शेवाळे सरांचा वाटा मोठा होता. आंबेडकरी चळवळीत हजारो कार्यकर्ते घडविण्याचे काम त्यांनी केले. बहुजनांच्या विकासासाठी विविध संस्थांच्या माध्यामातून सामाजिक, शैक्षणिक कार्य केले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या डिप्रेस्ड क्लासेस सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक चळवळीत, तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड, रा. सु. गवई यांच्यासह रिपब्लिकन चळवळीच्या कार्याला सुरुवात केलेले शेवाळे सर ‘रिपाइं’ला जोडले गेल्याने पक्षाला उभारी मिळाली. शेवाळे सरांनी मला तीस वर्षे एकनिष्ठ साथ दिली. त्यांच्या जाण्याने रिपब्लिकन पक्षाचा शिलेदार हरवला आहे,” अशी भावना ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) राष्ट्रीय कोषाध्यक्ष मधुकर धर्माजी शेवाळे उर्फ एम. डी. शेवाळे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे स्मरण करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि सर्व आंबेडकरी पक्ष, संघटना, संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन सभेचे आयोजन केले होते. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या अभिवादन सभेला खासदार गिरीश बापट, आमदार सुनील कांबळे, माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, ऍड. जयदेव गायकवाड, काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी राज्यमंत्री रमेश बागवे, रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; दिलीप जगताप; राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,रिपब्लिकन युवा मोर्चा चे राहुल डंबाळे; यशवंत नडगम;’रिपाइं’ प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, माजी उपमहापौर सौ सुनिता वाडेकर; डॉ. सिद्धार्थ धेंडे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, मातंग आघाडीचे अध्यक्ष हनुमंत साठे, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, शहर सचिव महिपाल वाघमारे, ऍड.मंदार जोशी ; श्याम सदाफुले, बाबुराव घाडगे, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, संगीता आठवले, चांद्रकांता सोनकांबळे; शशिकला वाघमारे, हिमाली कांबळे, असीत गांगुर्डे, संजय सोनवणे, निलेश आल्हाट आदी उपस्थित होते.

प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला ‘शिका, संघर्ष करा, संघटीत व्हा’ हा मंत्र शेवाळे सरांनी स्विकारला. शैक्षणिक क्षेत्रामध्ये शेवाळे सरांनी नवीन पायंडा सुरु केला. उपेक्षित, दलित, गरिब मुलांना कमीत कमी खर्चात शिक्षण कसे देता येईल असा सातत्याने प्रयत्न त्यांच्या शिक्षण संस्थेतून होत होता. शेवाळे सरांनी स्वत:च्या मुलीचे लग्न विदर्भातील मुलाबरोबर करुन पुणे आणि विदर्भाचे मनोमिलन करण्यामध्ये पुढाकार घेतला. केवळ श्रद्धांजली किंवा अभिवादन सभेला एकत्र न येता इतर वेळीसुद्धा रिपब्लिकन पक्षातील लोक ज्यावेळी एकत्र येतील त्यावेळी शेवाळे सरांना ती खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.”

गिरीश बापट म्हणाले, “अभिवादन सभेसारखे कार्यक्रम मनाला वेदना देणारे असतात. आयुष्यभर समाजासाठी काम, कार्यकर्ते घडविण्याची धडपड, कायम पक्षाची चिंता शेवाळे सर करत असत. एखादी व्यक्ती आयुष्यात नसेल तर तीची किंमत उशीरा कळते. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करुन त्यातून निष्पन्न होणार्याअ गोष्टींची जाण आणि योग्य सुचना सल्ला देणारा माणूस आपल्यात नाही.”