Sameer Rizvi | ‘आधीच सांगितलं होतं पहिल्याच चेंडूवर षटकार…’, समीर रिझवीने पूर्ण केलं कुटुंबियांना दिलेलं वचन

Sameer Rizvi | चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलमध्ये सलग दोन विजय मिळवले आहेत. त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) नंतर गुजरात टायटन्सचा पराभव केला. चेन्नईसाठी दुसऱ्या सामन्यात रचिन रवींद्र आणि शिवम दुबे यांनी स्फोटक खेळी खेळली. दुबेने 23 चेंडूत 51 धावा केल्या. तर, रचिन रवींद्रने 20 चेंडूत 46 धावांची खेळी केली. कर्णधार रुतुराज गायकवाडने 36 चेंडूत 46, डॅरिल मिशेलने 20 चेंडूत 24* आणि समीर रिझवीने 6 चेंडूत 14 धावा केल्या. रिझवीने शेवटच्या षटकांमध्ये खळबळ उडवून सर्वांची मने जिंकली.

रिझवीने रशीदला धुतले
शिवम दुबे बाद झाल्यानंतर 19व्या षटकात रिझवी (Sameer Rizvi) फलंदाजीसाठी आला. त्याने आरसीबीविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले होते, पण त्या सामन्यात रिझवीला फलंदाजीची संधी मिळाली नाही. गुजरातविरुद्ध रिझवी जेव्हा क्रीझवर आला तेव्हा सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. त्याच्यासमोर जगातील सर्वोत्तम टी-20 गोलंदाज राशिद खान होता. रिझवीने त्याचा अजिबात परिणाम होऊ दिला नाही आणि रशीदच्या पहिल्याच चेंडूवर लेग साइडला षटकार ठोकला. तो इथेच थांबला नाही. रिझवीने ऑफ साइडमध्ये रशीदला षटकार ठोकला.

रिझवीने दिलेले वचन पूर्ण केले
सोशल मीडियावर रिझवीचे खूप कौतुक होत आहे. त्याच्या कुटुंबाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये प्रत्येकजण चेन्नईचा सामना पाहत आहे. रशीदच्या चेंडूवर रिझवीने षटकार ठोकताच सर्वांनी जल्लोष केला. कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, “रिझवीने आधीच सांगितले होते की, आयपीएलमध्ये सिक्स मारून खाते उघडणार आहे.” रिझवीने कुटुंबीयांना दिलेले वचन पूर्ण केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

पुणे तिथे काय उणे? पुण्यासाठी मोहोळ, धंगेकर, मोरे आले एकत्र

Prakash Ambedkar | वंचितला अजून पाठींबा दिलेला नाही, मनोज जरांगेंनी फेटाळला प्रकाश आंबेडकरांचा दावा

Mumbai LokSabha | मुंबईतील सहापैकी चार लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे, कोणा कोणाला मिळालं तिकीट?