गॅस सिलेंडरची अवैध वाहतूक व साठवणुकीवर मोठी कारवाई

Pune : अन्नधान्य वितरण कार्यालयाच्यावतीने मोरे वस्ती, चिखली, पिंपरी चिंचवड (Pune) येथे बुधवारी (ता.३१) छापा टाकून मामा गॅस सर्विस एजन्सीविरुद्ध गॅस सिलेंडरची (Gas cylinder) अवैध साठवणूक, वाहतूक या अनुषंगाने मोठी कारवाई करत ३५ लाख ७३ हजार ५४५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते यांनी दिली.

या कारवाईमध्ये ४ मोठी वाहने, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे गॅस भरलेले १०५ सिलेंडर व रिकामे ६०२ सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत आरोपी भिकचंद हिरालाल कात्रे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

कात्रे यांच्याविरुद्ध चिखली पोलीस ( Chikhali Police) ठाण्यात भादवी कलम ४२०, २८५, २८६ सह जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ नुसार तसेच एलपीजी (पुरवठा व वितरण आदेश) आदेश २००० चे कलम ३ ते ७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई परिमंडळ अधिकारी सचिन काळे, पुरवठा निरीक्षक श्रीमती स्नेहल गायकवाड, अमोल हाडे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मोरे आदींनी केली आहे, असेही गिते यांनी कळविले आहे.

महत्वाच्या बातम्या-

देशातील सर्व घटकांना मदत करणारा सर्वसमावेश अर्थसंकल्प – मंत्री छगन भुजबळ

Jayant Patil | निराशाजनक,नकारात्मक आणि नाविन्य नसलेला अर्थसंकल्प! जयंत पाटील यांची तिखट प्रतिक्रिया

Interim Budget 2024 | निवडणुका आल्यानंतर का होईना पंतप्रधानांनी सांगितलं की सुटाबुटातल्या मित्रांच्या पलीकडेही हा देश आहे- ठाकरे