लाजिरवाण्या पराभवानंतरही इंग्लंडच्या कर्णधाराने मानली नाही हार; म्हणाला, ‘मालिका ३-२ ने जिंकणार’

India vs England, Ben Stokes:  पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा (IND vs ENG) 434 धावांनी पराभव केला. राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लिश संघ 557 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 122 धावांवर गडगडला. या दणदणीत विजयासह भारताने कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. कसोटी मालिकेतील चौथा सामना 23 फेब्रुवारीपासून रांची येथे खेळवला जाणार आहे.

स्टोक्सने अजूनही पराभव स्वीकारलेला नाही
राजकोट कसोटीतील पराभवानंतर इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने मोठे वक्तव्य केले आहे. आपला संघ कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी होईल, असा विश्वास स्टोक्सला अजूनही आहे. स्टोक्सच्या मते, इंग्लिश संघ भावनांना मागे सोडून उर्वरित दोन सामने जिंकून मालिका 3-2 ने जिंकण्याचे लक्ष्य ठेवेल.

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्टोक्स म्हणाला, ‘मी इथे येण्यापूर्वी बोललो होतो आणि म्हणालो की असे आठवडे कठीण असतात. इंग्लंडसाठी मॅच हरणे हे तुम्हाला तिथे हवेसे वाटत नाही, पण वैयक्तिकरित्या मला वाटते की जिंकणे किंवा हरणे हे मनात असते. प्रत्येक प्रकारच्या भावना, निराशा आता फक्त ड्रेसिंग रूममध्येच राहतील आणि ती फक्त एवढ्यापुरतीच मर्यादित राहील याची मी खात्री केली आहे. आमच्याकडे अजून दोन सामने शिल्लक आहेत आणि कर्णधार म्हणून मी ही मालिका 3-2 ने जिंकण्याचा विचार करत आहे.’

इंग्लंड ‘बझबॉल’ रणनीतीला चिकटून राहील
स्टोक्सने सांगितले की, त्यांचा संघ ‘बझबॉल’ रणनीतीला चिकटून राहील. तो म्हणाला, ‘आमची फलंदाजी फळी आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी भरलेली आहे. आम्ही त्यांना परिस्थितीनुसार खेळण्याचे स्वातंत्र्य देतो. तुम्ही फरक पाहू शकता. भारताने गेल्या दोन सामन्यांमध्ये खूप धावा केल्या, त्यांना असे खेळायचे आहे. आम्ही देखील हे अधूनमधून करू शकलो, पण इच्छा असूनही ते फार काळ टिकवू शकलो नाही.’

महत्वाच्या बातम्या-

ऐतिहासिक! रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताचा इंग्लंडवर सर्वात मोठा विजय, ४३४ धावांनी जिंकली कसोटी

Sunetra Pawar | सुप्रिया सुळे यांच्यासमोर आव्हान निर्माण करणाऱ्या सुनेत्रा पवार नेमक्या कोण आहेत?

Ambernath | धक्कादायक ! चोरीच्या संशयातून दोन तरुणांना जमावानं बेदम मारहाण करून संपवलं