या निरागस बालिकेच्या फेसबुक वॉल वर जाऊन जरा बघा तिने काय गुण उधळले आहेत – आव्हाड

ठाणे – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर फेसबुक पोस्ट (Facebook post) केल्यामुळे अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिच्या विरोधात राज्यभर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  एका बाजूला या घडामोडी घडत असताना आता केतकीच्या वयाचा  आणि सगळ्या बाबींचा विचार करता तिला वॉर्निंग देऊन या गोष्टींना पूर्णविराम द्यायला हवं, असं मत भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केलं आहे.

एखाद्याने सोशल मीडियावर (Social Media) काय लिहावं हा व्यक्तीस्वातंत्र्याचा भाग असला तरी सर्वांचा सन्मान ठेवणं गरजेचं आहे. टीकासुद्धा अशी करावी, ज्यात बीभत्सपणा नसावा असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. यानंतर आता मंत्री जितेंद्र आव्हाड (Minister Jitendra Awhad) यांनी एक पोस्ट लिहिली असून या सर्व प्रकरणावर आपली सविस्तर भूमिका मांडली आहे.

जितेंद्र आव्हाड यांची फेसबुक पोस्ट 

पुरोगामी महाराष्ट्राच्या सगळ्या महामानवांना शिव्या द्यायच्या आणि काही लोकांनी उठायचं आणि म्हणायचं निरागस आहे सोडून द्या. ह्याला काय म्हणायचे? केतकी चितळे बद्दल थोडी वस्तुस्थिती समोर आणायचा प्रयत्न. केतकी चितळे हि 34 वर्षांची आहे 29 वर्षांची नाही. ठाण्यात दाखल गुन्ह्यात केतकी हीच्याकडे तपास पूर्ण झाल्यावर स्वतःहून पोलिसांनी तिची पोलीस कोठडी न मागता न्यायालयीन कोठडी मागितली आहे. त्यानंतर त्या प्रकरणात ईतर ठिकाणी जरी गुन्हे नोंद असले तरी तिचा राज्यातील अन्य कोणत्याही पोलिसांनी तिचा ताबा मागितला नाही अथवा तिला “त्या आक्षेपार्ह पोस्ट” फेसबुक वर अपलोड केल्याबद्दल अटक केली नाही आहे.

ही पण एक समंजसपणाची कृतीच म्हणावी लागेल. 2020 मध्ये अगोदरच केतकी चितळे हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि महात्मा फुले यांच्या बद्दल अत्यंत अश्लील अश्लाघ्य आणि निषेधार्य पोस्ट अपलोड केल्या होत्या. त्यावेळी म्हणजे 2020 मध्ये केतकी जरी 32 वर्षांची असली तरी नासमज आहे असे समजून पोलिसांनी कदाचित अटक केली नसेल परंतु आवश्यक तपासा नंतर तिच्या विरुद्ध पुरावा मिळाल्याने दोषारोपपत्र दाखल कारण्याची परवानगी रबाळे पोलिसांनी मागितली आहे. आता आज केतकी ला 2020 मध्ये तिने वरील प्रमाणे इतिहासातील महामानवांबद्दल आणि दलित समाजाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह अश्लील आणि बेताल लिखाण केल्याबद्दल अटक केली आहे. कारण आमच्या माहिती नुसार केतकी ने या सर्व पोस्ट मीच फेसबुक वर share केल्या असून त्याबद्दल मी ठाम असून त्या डिलीट करणार नसल्याचे पोलिसांना काय न्यायालयात पण स्पष्ट सांगितले आहे.

या अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि महात्मा फुले यांच्या बद्दल अत्यंत हिणकस लिखाण शेअर करून देखील त्या वेळी कदाचित पोलिसांनी तिला अटक केली नाही तिच्याकडून येणारी गुळमुळीत उत्तरे घेऊन तिला एक प्रकारे माफी करून अटक न करता तिच्याविरुद्ध दोषारोपपत्र सादर करण्याचा उपचार केला होता. त्यामुळे तपासात तिने अशा आक्षेपार्ह पोस्ट share केल्या तरी काही होत नाही. पोलिसांना काही कारवाई करण्याचा अधिकार नाही आणि त्या पोस्ट मी डिलीट करणार नाही असा अविर्भाव घेतला होता. पोलिसांनी याबद्दल न्यायालयात अहवाल पण सादर केल्याचे समजते.

म्हणजे 2020 मध्ये या 32 वर्षाच्या निरागस अभिनेत्रीला पुरेशी समज देऊन देखील जर तिच्या दुष्कृत्याबद्दल तिला यत्किंचित पण चूक वाटत नसेल तर याच भारताला राज्यघटना देणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि समाजाला स्वातंत्र्य समता आणि बंधुतेची शिकवण देणाऱ्या महात्मा फुले या महामानवांच्या प्रतिमेस जाणीवपूर्वक लांछन लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या या आज 34 वर्षाच्या या निरागस बालिकेला पुन्हा तशाच स्वरूपाचा गुन्हा करण्याचे बळ नक्कीच मिळाले नसते. कायदा किंवा पोलीस एक दोन वेळ संधी नक्कीच देतात हो. पण आपण त्या संधी साठी लायक नसेल आणि पोलीस किंवा कायद्याने समजूतदारपणाच्या घेतलेल्या भूमिकेला माझे काय वाकडे केले पोलिसांनी असा समज करून पुन्हा जाणीवपूर्वक त्या चुका नव्हे गुन्हा करण्याचा चंग कोणी बांधला असेल तर पोलीस तरी काय करणार तुम्ही विचार करा.

या निरागस बालिकेच्या फेसबुक वॉल वर जाऊन जरा बघा केतकीने काय गुण उधळले आहेत. शिवाजी महाराज.महात्मा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर,रमाई ,व आंबेडकरी जनता ह्यांच्या बद्दल जे काही लिहिले आहे ते निरागस बालिकेनी लिहिले आहे असे म्हणाऱ्यांचे मन कुठल्या विचारांनी भरले आहे हे स्पष्ट होते अर्थात गांधी हत्या करणाऱ्या नथूरामचे समर्थन करणाऱ्या कडून काय अपेक्षा करायच्या ?.