Raayan Poster Release | धनुषच्या मोस्ट अवेटेड चित्रपट ‘रायन’चे पोस्टर रिलीज

Raayan Poster Release : साउथ सुपरस्टार धनुषने त्याच्या 50 व्या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे. रायन असे या चित्रपटाचे नाव असून तो यावर्षी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. मात्र, हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार किंवा त्याच्याशी संबंधित जास्त माहिती देण्यात आलेली नाही, फक्त चित्रपटाचे शीर्षक काय असेल हे सांगण्यात आले आहे.

काही काळापूर्वी धनुषने चित्रपटाचे पोस्टर रिलीज (Raayan Poster Release) केले होते मात्र त्याचा चेहरा समोर आला नव्हता. तेव्हापासून चाहते खूप उत्सुक होते पण आता त्याचा चेहराही समोर आला आहे आणि चित्रपटाचे नावही समोर आले आहे. धनुष या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून त्याने त्याची कथाही लिहिली आहे. या चित्रपटाला ए आर रहमान यांचे संगीत असून तो या वर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

धनुषने इन्स्टाग्रामवर त्याच्या आगामी चित्रपटाचे शीर्षक सांगून चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये धनुषचा लूक खूपच उग्र दिसत आहे आणि हा चित्रपट देखील ॲक्शन, थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेला दिसत आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना धनुषने चित्रपटाचे नाव फक्त ‘रायन’ असे लिहिले आहे.

धनुषचा शेवटचा रिलीज झालेला कॅप्टन मिलर हा सुपरहिट होता. अरुण माथेश्वरन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात स्वातंत्र्यापूर्वीची कथा दाखवण्यात आली आहे. धनुषने साऊथ चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. बॉलीवूडमध्ये त्यांनी रांझना, अतरंगी रे आणि शमिताभ सारखे चित्रपटही केले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Jayant Patil भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

भाजपसोबत युती करणार का?; आशिष शेलार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे काय म्हणाले?

मनसे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीसह जाणार? आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, तासभर चर्चा