टी20 विश्वचषकातून कुणाचाही कटू शकतो पत्ता, मुख्य प्रशिक्षक द्रविडच्या वक्तव्याने वातावरण तापले

Rahul Dravid On T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 यावर्षी जूनमध्ये खेळवला जाणार आहे. विश्वचषकापूर्वी, टीम इंडियाने सर्व टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आता भारतीय खेळाडूंकडे उर्वरित जागांची तयारी करण्यासाठी फक्त आयपीएल 2024 शिल्लक आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी भारताने अफगाणिस्तानविरुद्ध (India vs Afghanistan) शेवटची टी-20 मालिका खेळली होती, ज्यामध्ये भारताने 3-0 असा विजय मिळवला होता. अफगाणिस्तानसोबतच्या मालिकेनंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Head Coach Rahul Dravid) यांनी सांगितले की, त्यांच्याकडे टी-20 विश्वचषकासाठी अनेक पर्याय आहेत.

अफगाणिस्तान आणि त्याआधी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी20 मालिकेत अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली होती, कारण संघातील काही वरिष्ठ आणि नियमित खेळाडू एकतर विश्रांतीमुळे किंवा दुखापतीमुळे बाहेर पडले होते. अशा परिस्थितीत वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत संधीचा फायदा घेत संघातील युवा आणि अनियमित खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत यंदाच्या विश्वचषकासाठी पर्याय म्हणून स्वत:ला सादर केले.

अधिक पर्यायांमुळे टी-20 विश्वचषकात कोणताही खेळाडू बाहेर पडण्याचा धोकाही वाढतो. अफगाणिस्तानविरुद्धचा तिसरा टी-20 जिंकल्यानंतर भारतीय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले, “एकदिवसीय विश्वचषकानंतर वेगवेगळे खेळाडू खेळले, ज्याची अनेक कारणे होती. पण आमच्याकडे पर्याय आहेत हे चांगले आहे.”

द्रविड पुढे म्हणाला, “आम्हाला काही पैलूंवर काम करावे लागेल आणि त्यावर विचार करत आहोत. एक संघ म्हणून आम्हाला इतके सामने खेळावे लागणार नाहीत. आयपीएल आहे, ज्यामध्ये या खेळाडूंवर नजर असेल.”

शिवम दुबेच्या कामगिरीवर राहुल द्रविड खूश

शिवम दुबेबद्दल बोलताना भारतीय मुख्य प्रशिक्षक म्हणाले, “तो खूप दिवसांनी परतला आहे आणि पूर्वीपेक्षा चांगला खेळाडू म्हणून परतला आहे. त्याच्याकडे नेहमीच प्रतिभा होती. मी त्याच्या कामगिरीवर खूप आनंदी आहे. यामुळे त्याचा आत्मविश्वासही वाढेल की आपल्या पुनरागमनामुळे आपण ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ झालो आहे.”

विकेटकीपिंगमध्येही अनेक पर्याय आहेत

याशिवाय विकेटकीपिंगच्या पर्यायांबद्दल मुख्य प्रशिक्षक म्हणाले की, “आमच्याकडे अनेक पर्याय आहेत. संजू, किशन आणि ऋषभ हे सगळेच आहेत. आता पुढील काही महिन्यांत काय परिस्थिती आहे ते पाहावे लागेल आणि त्यानुसार निर्णय घेतला जाईल. ”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या-

Bhalchandra Nemade: वाल्मिकीचा राम खरा कसा म्हणायचा? नेमाडे पुन्हा बरळले

असीम सरोदे यांना ठाकरेंनी नगरसेवक किंवा आमदारकीची तिकीट द्यावे; मातब्बर नेत्याची मागणी

सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, नितीन गडकरी …