सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, नितीन गडकरी …

Sushilkumar Shinde – माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मला आणि प्रणिती शिंदेला दोन वेळा भाजपाची ऑफर मिळाली, असा गौप्यस्फोट शिंदे यांनी केला आहे.

दरम्यान, शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि सुशीलकुमार शिंदे यांची भेट घडून आली. नाट्यसंमेलमाचं निमंत्रण देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. यावेळी सुशील कुमार शिंदे यांना भाजपने ऑफर दिली का? असा सवाल माध्यमांनी विचारला त्यावर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “सुशीलकुमार शिंदे यांना अधिकृतपणे 2019 मध्ये आणि आताही भाजपात येण्याची ऑफर दिलेली नाही. शेवटी नात्यांच्या आधारे, हाय सुशीलजी, येणार की नाही? असं कुणीतरी म्हटलं असेल. आमचे नितीन गडकरी सारखे नेते त्यांचे मित्र आहेत. आताही त्यांनी त्यांच्या आठवणी काढल्या. अशा मित्रांपैकी कुणी म्हटलं असेल, पण याला राजकीय भेट किंवा राजकीय ऑफर म्हणता येणार नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्त्वाच्या बातम्या-

नितेश तिवारीच्या ‘रामायण’मध्ये बॉबी देओल कुंभकर्णाच्या भूमिकेत दिसणार? जाणून घ्या सत्य

‘हे’ आहेत जगातील सर्वोत्तम तांदूळ, तांदळाची ‘ही’ भारतीय जात पहिल्या क्रमांकावर

अरे हे काय? इशानसाठी देशापेक्षा IPL महत्त्वाचे! मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी टीम इंडियातून बाहेर

Sharad Mohol : शरद मोहोळ प्रकरणात अटकेत असणारा विठ्ठल शेलार नेमका कोण आहे?