Rahul Gandhi | नरेंद्र मोदी केवळ मुखवटा, विरोधकांचा लढा एकाव्यक्ती विरोधात नाही एका शक्तीविरोधात

मुंबई : शिवाजी पार्कवरील इंडिया आघाडीच्या (India Alliance) अतिविशाल सभेला संबोधित करताना खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, देशातील सर्व विरोधी पक्ष एका पक्षाविरोधात किंवा एका व्यक्तीच्या विरोधात लढत आहेत हे चुकीचे आहे. एका व्यक्तीला चेहरा बनवनू पुढे केले आहे. आम्ही या शक्तीच्या विरोधात लढत आहोत. नरेंद्र मोदी (Narendra Modi) हा केवळ मुखवटा आहे. अभिनेत्याला जसे भूमिका दिल्या जातात तशाच भूमिका त्यांच्या कडून करून घेतल्या जातात, मोदींची ५६ इंचाची छाती नाही, मोदी एक पोकळ व्यक्ती आहे. राजा की आत्मा ईव्हीएममध्ये आहे हे खरे आहे. ईडी, सीबीआय सारख्या हिंदुस्थानच्या प्रत्येक संस्थेत राजाचा आत्मा आहे. भिती दाखवून पक्ष फोडले जात आहेत. पक्ष सोडणारे सर्वजण घाबरून भाजपात गेले आहेत. देशातील मीडिया व सोशल मीडियासुद्धा सामन्यांच्या हातात नाही. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, महिलांचे प्रश्न आहेत पण ते दाखवले जात नाहीत. नरेंद्र मोदी ईव्हीएमशिवाय निवडणुका जिंकू शकत नाहीत.

विरोधीपक्षाला ईव्हीएम दाखवावे, ईव्हीएमबरोबर मतदान केल्यानंतर VVPAT स्लीप डब्ब्यात पडते त्याचीही मोजणी करा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली परंतु निवडणूक आयोग मोजणी करण्यास नकार देत आहे. मोदी फक्त जनतेची दिशाभूल करत आहेत. मला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली, ईडी ऑफीसमध्ये अनेक तास बसवले पण घाबरलो नाही, मी कोणालाही घाबरत नाही. तसेच इंडिया आघाडीतील नेतेही घाबरत नाहीत. ही आघाडी हिंदुस्थानचे रक्षण करण्यास एकत्र आले आहेत. नरेंद्र मोदींकडे भ्रष्टाचाराची मक्तेदारी आहे. इलोक्टोरोल बाँडमधून खंडणी वसुली केली जाते. महान व्यक्तींनी एकच संदेश दिला आहे आणि तो म्हणजे नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान उघडा,असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.

शिवाजी पार्कवरील सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi), महासचिव प्रियंका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, पिडिपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती, काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, प्रभारी रमेश चेन्नीथला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

सभेपूर्वी खासदार राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

वन इलेक्शन, वन नेशन आणि नो इलेक्शन करण्याचा भाजपा डाव, लोकशाही व्यवस्था धोक्यातः Jairam Ramesh

‘शिवसेना फोडून मविआ सरकार पाडण्यासाठी भाजपाने वापरला ईलेक्टोरोल बाँडचा पैसा’

मोहोळांचा भर पक्षांतर्गत भेटीगाठींवर! अनिल शिरोळे, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, योगेश गोगावले यांच्या भेटी