इथं फक्त मराठीच चालणार याची आठवण पुन्हा-पुन्हा करायला लावू नका, राज ठाकरेंचा थेट इशारा

मुंबई : राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून या संदर्भात महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करण्यात येईल.

कामगार संख्या 10 पेक्षा कमी असलेल्या आस्थापना तसेच 10 पेक्षा अधिक असलेल्या आस्थापना, अशा सर्व आस्थापना, देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करतील. मालक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपी बरोबरच इतर भाषेतही लिहू शकतो.

ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पात्र काढून या निर्णयाचे खरे श्रेय हे महाराष्ट्र सैनिकांचे असल्याचे ठासून सांगितले आहे. तर महाराष्ट्र फक्त फक्त मराठीच चालणार याची आठवण आम्हाला पुन्हा पुन्हा करायला लावू नका. असा थेट इशाराच राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.

काय आहे राज ठाकरे यांच्या पत्रात ?

या महाराष्ट्र दुकानावर मराठीतच पाट्या असाव्यात यासाठी खरतर आंदोलन करूच लागू नये. परंतु २००८,२००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात यासाठी महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या.

काळ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला तेव्हा त्याचं श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये. त्याचार अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच. आणि महाराष्ट्र सरकारचंही अभिनंदन ! सरकारला आता मी इतकाच सांगेन की आता कच खाऊ नका. याची अंलबजावणी नीट करा.

यात आणखी एक भानगड सरकारने करून ठेवली आहे की, मराठी भाषांशिवाय इतर भाषा नामफलक चालतील म्हणून. याची काय गरज आहे ? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, आणि देवनागली लिपी सर्वांना समजते. इथं फक्त मराठीच चालणार याची आठवण आम्हाला पुन्हा-पुन्हा करायला लावू नका ! पुन्हा एकदा महाराष्ट्र सैनिकांचं मनःपूर्वक अभिनंदन.