राम आमच्या मनात, विरोधकांनी आम्हाला राजकारण शिकवू नये – संजय राऊत

अयोध्या – राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Environment Minister and Shiv Sena leader Aditya Thackeray) आज अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी राज्यातूनही हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल (Shiv Sainik arrives in Ayodhya) झाले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी अयोध्या दौरा रद्द केल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा हा दौरा होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आज संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, अयोध्येत आम्ही गेल्या 35 वर्षांपासून येत आहोत. त्यामुळे कोणी आम्हाला हनुमान चालिसा पुस्तक घेऊन राजकारण शिकवण्याचा प्रयत्न करत असेल. त्यांनी ते त्यांच्यापुरते ठेवावे. आमच्या मनात राम आहेत, असे म्हणत त्यांनी राणा दाम्पत्याला टोला लगावला.

संजय राऊत म्हणाले की, देशातील लोकशाहीचा डंका जगभरात वाजवला जातो. त्याच भारतात लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. हा देशाच्या स्वातंत्र्याचा पराभव असल्याचेही त्यांनी म्हटले. हा पराभव भाजपच्या नेतृत्वातील सरकारने केला आहे. त्यामुळे स्वतंत्र्याची लढाई पुन्हा लढावी लागेल, अशा प्रकारचे चित्र देशात निर्माण झाले आहे.