‘राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये संजय राऊतांनी आग लावली; आता त्यांची मजल छत्रपतींच्या घरापर्यंत गेलीय’

मुंबई – संजय राऊतांचा घर फोडण्याचा इतिहास आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरेंमध्ये (Uddhav Thackeray) भांडणं लावण्यात ज्या काही व्यक्ती पुढे होत्या त्यात संजय राऊतांचा (Sanjay Raut) समावेश होता. आता त्यांची मजल छत्रपतींचं घर फोडण्यापर्यंत गेलीय, अशी गंभीर टीका भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सोमवारी सायंकाळी कोल्हापूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

संजय राऊतांनी याअगोदर ठाकरेंचं घर फोडलेलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये भांडण लावण्यामध्ये जे काही व्यक्ती पुढे होते त्यात संजय राऊत होते. घरं फोडायची कशी याचा चांगला इतिहास संजय राऊतांचा आहे. हे काय त्यांच्यासाठी नवं नाही,” असा टोला नितेश राणेंनी लागवला.  तुम्हाला आठवत असेल राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडलेली तेव्हा त्यांच्या समर्थकांनी यांची (संजय राऊतांची) गाडी फोडलेली.

आपल्याला खूप लोकांना आठवत असेल ती का तोडलेली कारण संजय राऊतांनी दोन्ही भावंडांमध्ये आग लावण्याचं काम केलेलं, असंही  राणे म्हणालेत.  पुढे बोलताना निलेश राणेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचाही उल्लेख केला. “असंख्य वेळा बाळासाहेब ठाकरेंनी याचा उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये केलेलाय, की आमच्या घरामध्ये आग लावली जातेय, असं  राणे म्हणाले.