‘सांगली मध्ये साधू संता सोबत जो काही अभद्र प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे’

मुंबई – सांगलीत (Sangli) चोर समजून साधूंना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. सांगलीच्या जत (Jath) तालुक्यातील लवंगा गावात हा सर्व प्रकार घडला. मुलं पळवणारी तसेच चोरांची टोळी समजून चार साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून पालघर प्रकरणाची पुनरावृत्ती थोडक्यात टळली.

मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चारही साधू उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) रहिवाशी असून ते कर्नाटकात देवदर्शनासाठी जात होते. येथील स्थानिक लोकांना त्यांची भाषा समजू शकली नाही, त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर संशय बळावला. मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून गावकऱ्यांना चारही साधूंना मारहाण केली.

दरम्यान, आता या प्रकारावर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. भाजप आमदार राम कदम (BJP MLA Ram Kadam) म्हणाले, सांगली मध्ये साधू संता सोबत जी दुर्दैवी मारहाण झाली… त्याच्यबरोबरच जो काही अभद्र प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे. महाराषट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीत साधू संतांचा अपमान कधीही खपवून घेतला जाणार नाही.. पालघर हत्याकांडात निर्दोष साधुंवर तत्कालीन फेसबुक लाइव्ह मुखमंत्री आणि त्यांच्या सरकारने अन्याय केला.. त्यांचा प्रखर हिंदू (Hindu) विरोध देशाने पहिला. मात्र वर्तमान सरकार हे साधू संतांचा सन्मान करणारे सरकार आहे. दोषींना कठोर शासन केले जाईल. असं कदम यांनी म्हटले आहे.