RR vs LSG : राजस्थानने लखनऊच्या जबड्यातून खेचला विजय, २० धावांनी जिंकला सामना

RR vs LSG Full Highlights: आयपीएल 2024 चा चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (Rajasthan Royals vs Lucknow Super Giants) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने लखनऊचा 20 धावांनी पराभव केला. राजस्थान रॉयल्सने प्रथम खेळताना 20 षटकांत 193 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ संघाने सुरुवातीलाच अधिक विकेट गमावल्या, त्यामुळे त्यांना केवळ 173 धावा करता आल्या.

या सामन्यात संजू सॅमसनने 52 चेंडूत 82 धावांची खेळी केली, ज्यात त्याने 3 चौकार आणि 6 षटकार मारले. रियान परागही सामन्याचा हिरो ठरला, त्याने 29 चेंडूत 43 धावा केल्या. केएल राहुल आणि निकोलस पूरन यांच्यातील 85 धावांच्या भागीदारीने सामना रोमांचक झाला होता. केएल राहुलने 44 चेंडूत 58 आणि निकोलस पुरनने 41 चेंडूत 64 धावा केल्या. पूरण शेवटपर्यंत क्रीजवर राहिला, मात्र आवेश खानच्या भेदक गोलंदाजीने राजस्थानचा विजय निश्चित केला. या सामन्यात राजस्थानने लखनौचा 20 धावांनी पराभव केला आहे. हा त्यांचा हंगामातील पहिला विजय आहे.

महत्वाच्या बातम्या-

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांच्या विजयासाठी मेधा कुलकर्णींनी कसली कंबर

Rohit Pawar | शासकीय आश्रम शाळेत दूध घोटाळा; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

Sharad Pawar | केजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपला मोजावी लागणार