भाजपकडून विधान परिषदेच्या सभापती पदासाठी राम शिंदेंचं नाव आघाडीवर

मुंबई – विधानपरिषद सभापती पदासाठी भाजपकडून राम शिंदे (Ram Shinde) यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. या पदासाठी राम शिंदे यांचं नाव भाजपकडून (BJP) सर्वात पुढे आहे. नगरच्या कर्जतमधून दोनवेळा विधानसभेवर निवडून आलेले राम शिंदे फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. पण गेल्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादीच्या रोहित पवारांकडून पराभूत झाले. त्यानंतर आता त्यांची विधानपरिषदेवर निवड झालीय. त्यांना विधान परिषदेचे सभापती (Legislative Council Speaker) म्हणून संधी देण्यात येईल अशी चर्चा आहे.

सद्यस्थितीत विधानपरिषदेत भाजपकडे २४, तर शिवसेनेकडे 11 आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे प्रत्येकी 10 जागा आहेत. तसंच 16 जागा रिक्त आहेत. यामध्ये राज्यपाल नियुक्त 12 जागांचाही समावेश आहे. विधान परिषदेचा सभापती निवडण्यापूर्वी या जागांची नियुक्ती झाल्यास भाजपचे संख्याबळ महाविकास आघाडी (MVA) पेक्षा जास्त होतं आणि भाजपला विधान परिषदेतही बहुमत सिद्ध करता येईल.